8 ऑगस्ट 2018 रोजी 'आमचे राजीनामे खिशात', तारखेनुसार शिवसेना-भाजपा नेत्यांचे बोचकारे अन् फटकारे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 06:59 AM2019-02-19T06:59:14+5:302019-02-19T06:59:59+5:30
आजवर आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला. - उद्धव ठाकरे, ३० आॅक्टोबर २०१५
आजवर आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला.
- उद्धव ठाकरे, ३० आॅक्टोबर २०१५
वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात, आमची जात.. आम्हाला पंजा दाखवू नका.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
३० आॅक्टोबर २०१५
यापुढे युती करणार नाही. शिवसेनेच्या ५० वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे २५ वर्षे वाया गेली. आता युतीसाठी कोणाचा दरवाजा ठोठावणार नाही.
- उद्धव ठाकरे, २६ जानेवारी २०१७
आता मैत्रीपूर्ण सामने बंद. युतीचे राजकारण बास्स झाले.
- उद्धव ठाकरे, ५ फेब्रुवारी २०१७
सावजाची शिकार मीच करेन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. पण, आता सावजच दमलंय, त्याला मारण्यासाठी बंदुकीचीही गरज नाही.
- उद्धव ठाकरे, २४ जुलै २०१८
स्वबळावर लढणे हा गुन्हा नाही. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हालाच लढावे लागेल.
- उद्धव ठाकरे, २४ जानेवारी २०१८
या सरकारने जनतेला फसविल्याने भाजपशी युती नाही. स्वतंत्रपणे निवडणूक लढून संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार.
- उद्धव ठाकरे, २८ फेब्रुवारी २०१८
यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. भाजपचे नेते काहीही म्हणू द्या, शिवसेनेसाठी युतीचा अध्याय संपला आहे.
- उद्धव ठाकरे, ११ मे २०१८
आम्ही राजीनामे खिशात घेऊन
फिरत आहोत.
- दिवाकर रावते, ८आॅगस्ट २०१८
खानाच्या फौजांचा पद्धतशीर
सामना करू.
- उद्धव ठाकरे, १८ आॅक्टोबर २०१८
शिवसेनेचे प्रेम छुपे आहे, तर आमचे उघड आहे. कुणी कितीही नाकारले, तरी भाजप आणि शिवसेनेची युती होणारच.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री,
११ नोव्हेंबर २०१८
शिवसेना पोकळ धमक्या आणि पादºया पावट्याच्या इशाºयाला घाबरत नाही.
- संजय राऊत, ७ जानेवारी २०१९
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहावे. युती होईल की नाही, या द्विधा मनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक; नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे).
- अमित शहा, भाजपाध्यक्ष,
६ जानेवारी २०१९