आजवर आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला.- उद्धव ठाकरे, ३० आॅक्टोबर २०१५
वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजती दात, आमची जात.. आम्हाला पंजा दाखवू नका.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,३० आॅक्टोबर २०१५
यापुढे युती करणार नाही. शिवसेनेच्या ५० वर्षांच्या इतिहासामध्ये या युतीमुळे २५ वर्षे वाया गेली. आता युतीसाठी कोणाचा दरवाजा ठोठावणार नाही.- उद्धव ठाकरे, २६ जानेवारी २०१७
आता मैत्रीपूर्ण सामने बंद. युतीचे राजकारण बास्स झाले.- उद्धव ठाकरे, ५ फेब्रुवारी २०१७
सावजाची शिकार मीच करेन. त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही. पण, आता सावजच दमलंय, त्याला मारण्यासाठी बंदुकीचीही गरज नाही.- उद्धव ठाकरे, २४ जुलै २०१८
स्वबळावर लढणे हा गुन्हा नाही. आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हालाच लढावे लागेल.- उद्धव ठाकरे, २४ जानेवारी २०१८
या सरकारने जनतेला फसविल्याने भाजपशी युती नाही. स्वतंत्रपणे निवडणूक लढून संपूर्ण महाराष्ट्र भगवा करणार.- उद्धव ठाकरे, २८ फेब्रुवारी २०१८
यापुढे शिवसेना सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. भाजपचे नेते काहीही म्हणू द्या, शिवसेनेसाठी युतीचा अध्याय संपला आहे.- उद्धव ठाकरे, ११ मे २०१८
आम्ही राजीनामे खिशात घेऊनफिरत आहोत.- दिवाकर रावते, ८आॅगस्ट २०१८
खानाच्या फौजांचा पद्धतशीरसामना करू.- उद्धव ठाकरे, १८ आॅक्टोबर २०१८
शिवसेनेचे प्रेम छुपे आहे, तर आमचे उघड आहे. कुणी कितीही नाकारले, तरी भाजप आणि शिवसेनेची युती होणारच.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री,११ नोव्हेंबर २०१८
शिवसेना पोकळ धमक्या आणि पादºया पावट्याच्या इशाºयाला घाबरत नाही.- संजय राऊत, ७ जानेवारी २०१९आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहावे. युती होईल की नाही, या द्विधा मनस्थितीत राहू नये. युती झाली तर ठीक; नाहीतर शिवसेनेला आपटून टाकू (पटक देंगे).- अमित शहा, भाजपाध्यक्ष,६ जानेवारी २०१९