'तख्तावर औरंगजेब बसलाय, मंत्र्यांच्या कार्यक्रमात गर्दी चालते अन् शिवजंयतीला कलम 144'

By महेश गलांडे | Published: February 17, 2021 03:22 PM2021-02-17T15:22:10+5:302021-02-17T15:31:48+5:30

महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन तख्तावर औरंगजेब बसलाय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आलंय. आजपर्यंत सरकारमधील मंत्र्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर या सरकारने कधीच आक्षेप घेतला नाही,

Aurangzeb sits on the chair of maharashtra, bjp critics on shiv sena on 144 on shivneri fort on shivjayanti | 'तख्तावर औरंगजेब बसलाय, मंत्र्यांच्या कार्यक्रमात गर्दी चालते अन् शिवजंयतीला कलम 144'

'तख्तावर औरंगजेब बसलाय, मंत्र्यांच्या कार्यक्रमात गर्दी चालते अन् शिवजंयतीला कलम 144'

googlenewsNext
ठळक मुद्देज्यांनी शिवरायांच्या नावावर आजवर स्वतःची राजकीय पोळी भाजली, तेच लोकं आज शिवनेरीसह महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यास बंधने घालत आहेत. मान्य आहे, कोरोनामुळे ही बंधने लादली असावीत!,

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती(Shivjayanti) कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे, महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra government) नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल असून साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केला आहे. (Section 144 Imposed at Shivneri Fort on 19th Feb Shivjayanti Programme) त्यामुळे, शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपानेही शिवजयंती दिनी कलम 144 लागू केल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर जबरी टीका केलीय. 

महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन तख्तावर औरंगजेब बसलाय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आलंय. आजपर्यंत सरकारमधील मंत्र्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर या सरकारने कधीच आक्षेप घेतला नाही, मात्र शिवजयंती उत्सव साजरा करताना सरकारला कोरोनाची नियमावली आठवते. या मुघल विचारसरणी असणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात शिवजयंती दिनी शिवनेरीवर कलम १४४ लागू करणे यापेक्षा या महाराष्ट्राचे आणखी काय दुर्दैव असू शकते ? ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय निंदनीय आणि निषेधार्य आहे. महाराष्ट्रात ज्या पक्षांनी इतकी वर्ष शिवरायांच्या नावाचा वापर करून राजकारण केलं, आज तोच पक्ष सत्तेत असताना शिवजयंती दिनी शिवनेरीवर कलम १४४ लागू करण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. या पक्षांना केवळ राजकारणासाठी शिवराय हवे आहेत, मात्र त्यांची शिवजयंती नको!, असे म्हणत भाजपाने शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. 

ज्यांनी शिवरायांच्या नावावर आजवर स्वतःची राजकीय पोळी भाजली, तेच लोकं आज शिवनेरीसह महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यास बंधने घालत आहेत. मान्य आहे, कोरोनामुळे ही बंधने लादली असावीत!, परंतु केवळ अशी बंधने शिवजयंतीलाच का आठवली?, असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही शिवसेनेला लक्ष्य केले. 


 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे, काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे, त्यामुळे शिवप्रेमींनी गर्दी करू नका असं आवाहन स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी शिवप्रेमींना केलं आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान-अभिमान नसलेली शिवसेना”

शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता संबंध उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान-स्वाभिमान नसलेली शिवसेना आहे. बाळासाहेबांच्यावेळी वेगळी शिवसेना(Shivsena) होता, आता संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाला परवानगी दिली जाते. आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ मोर्चा निघतो, त्याला परवानगी मिळते. मग शिवजयंतीला परवानगी का मिळत नाही असा सवाल भाजपा खासदार नारायण राणेंनी(BJP Narayan Rane) उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेच्या सत्तेत साधू-संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना बंदी, पण गुंडांच्या मिरवणूकांना परवानगी आहे, असे म्हणत राणेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

नियमावली वेळीच बदला, अन्यथा...

शिवजयंती हा आपला वर्षातील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बारची वेळसारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती(Shiv Jayanti)ला नियमावली असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का? वेळीच ही नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका असा थेट इशाराच मनसे नेते बाळा नांदगावकर(MNS Bala Nandgoankar) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला(Shivsena) आणि राज्य सरकारला दिला आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना? (Rules for Shivjayanti Celebration in Maharashtra)

१) अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

२) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

३) कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

४) शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिमिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

५) आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

६) Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे

Web Title: Aurangzeb sits on the chair of maharashtra, bjp critics on shiv sena on 144 on shivneri fort on shivjayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.