गृहकर्जापासून वाहन कर्जाचे हप्ते थकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:21 AM2019-04-19T06:21:07+5:302019-04-19T06:21:17+5:30
आर्थिक अडचणींमुळे जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे जेटच्या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांनी घेरले आहे.
- खलील गिरकर
मुंबई : आर्थिक अडचणींमुळे जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यामुळे जेटच्या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांनी घेरले आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्जासहित विविध हप्ते थकल्याने हे हप्ते कसे भरायचे? अशा विवंचनेत हे कर्मचारी सापडले आहेत.
विमानसेवा बंद पडल्याने जेटच्या कर्मचाऱ्यांच्या चेहºयावर भविष्याबाबत चिंता दिसत आहे. १० मे रोजी बोली प्रक्रियेमध्ये काहीतरी चांगले होईल व जेटचे विमान पुन्हा उड्डाण घेईल या आशेवर कर्मचारी आपल्या मनाची समजूत घालत आहेत. दरम्यान, काही कर्मचाºयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा तर काहींनी नोटा वापरण्याचा इशारा दिला आहे.
जेट एअरवेजमध्ये सुमारे
२० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी दाम्पत्ये आहेत. त्यामुळे या दाम्पत्यांना रोजगार गमवावा लागल्याने मोठा धक्का बसला आहे. घरातील कमावणाºया दोन्ही व्यक्तींचे वेतन बंद झाल्याने त्यांना या परिस्थितीला कसे सामोरे जावे,
हेच कळेनासे झाले आहे. यामध्ये
१० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्यांचा समावेश आहे. जेटमध्ये मिळणारे वेतनमान इतर कंपन्यांच्या तुलनेत चांगले असल्याने आता
दुसºया कंपनीत कामाला जाताना वेतनाची पातळी खालावणार
आहे. मात्र, कंपनी बंद झाली
तरी पुन्हा चालू होईल, असा आशावाद अनेक कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.
>करिअरची चिंता सतावते
चार वर्षांपासून मी जेटमध्ये कार्यरत आहे. तीन वर्षे ग्राउंड स्टाफ होते. गेल्या वर्षभरापासून केबिन क्रू म्हणून काम करीत होते. एव्हिएशन क्षेत्रातील ही माझी पहिलीच नोकरी आहे. व्यवस्थापनाकडून याबाबत काहीही माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे धक्का बसला. माझ्या करिअरला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे करिअरबाबत चिंता आहे. घरच्यांना माझी काळजी वाटत आहे.
- मीनल डिंगले, केबिन क्रू
>आयुष्याची चेष्टा झाली
गेल्या ८ वर्षांपासून ‘मी’ जेटमध्ये अॅडमिन विभागात कार्यरत आहे. माझे पती प्रफुल्ल करोची हे १० वर्षांपासून जेटमध्ये केबिन क्रू आहेत. त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. माझे एक महिन्याचे वेतन थकले आहे. आम्ही दोघेही जेटमध्ये कार्यरत असल्याने कुटुंबाचा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे. आमच्यावर गृह कर्ज, वाहन कर्ज, लहान मुलीची शाळेची ६० हजार फी असे विविध हप्ते भरायचे आहेत. त्यामुळे पैसे कसे जमवायचे ही चिंता मनाला छळू लागली आहे. आयुष्याची चेष्टा झाल्यासारखे वाटत आहे.
- अश्विनी काकडे, अॅडमिन विभाग, जेट
संसार चालवायचा कसा ?
जेटमध्ये २० वर्षांपासून सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. १८ लाख रुपयांचे गृह कर्ज आहे; तसेच तीन लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. मात्र दोन महिन्यांचे वेतन थकल्याने संसाराचा गाडा कसा ओढायचा, हा यक्षप्रश्न भेडसावत आहे. खर्चाला पैसा उरलेला नाही. कर्मचाºयांना जगण्यासाठी कंपनी पुन्हा सुरू व्हायलाच हवी. तसेच जेटची इतकी मोठी समस्या असताना नेते मात्र निवडणुकीच्या प्रचारात गुंग आहेत. पंतप्रधानांनी याबाबत एक वक्तव्यदेखील केलेले नाही.
- भालचंद्र गांगुर्डे, सुरक्षा विभाग
>दुसºया कंपनीत शोषण होते
गेल्या पाच वर्षांपासून जेटमध्ये कामाला
आहे. बचतीच्या
पैशांमधून घर घेतले
आहे. त्याचा हप्ता
१८ हजार रुपये आहे. वडील सेवानिवृत्त असल्याने घराची जबाबदारी माझ्यावर
आहे. या समस्येमुळे घरच्यांना काळजी
वाटत आहे. दुसºया कंपनीत कामाला गेलेल्यांचे शोषण होत आहे. सध्याच्या वेतनाऐवजी कमी वेतन आॅफर केले
जात आहे.
- संकेश कांबळे
>विलंबामुळे नुकसान वाढेल
जेट बंद पडल्याने प्रचंड काळजी वाटत आहे. बोली प्रक्रिया लवकर झाली तर लवकर काम सुरू होईल जेणेकरून नवीन गुंतवणूकदारांना पहिल्या दिवसापासून नफा मिळविता येईल; मात्र या प्रक्रियेला जेवढा विलंब होईल तेवढे नुकसान वाढण्याची भीती आहे. सध्या ४० विमाने डी रजिस्टर्ड झाली आहेत. बोली प्रक्रिया लवकर झाली नाही, तर जेटच्या ताब्यातील विविध स्लॉट व इतर सुविधांसाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील. कंपनीने घाटकोपर, कुर्ला व अंधेरी येथून सुरू असलेली बससेवा बंद केल्याने कर्मचाºयांना स्वत: खर्च करून कामावर यावे लागत आहे.
- नीलेश महाडिक
>कंपनीची साथ
सोडणार नाही
जेट एअरवेजमध्ये काम करणे हे अनेकांप्रमाणे माझे स्वप्न होते. आता कठीण परिस्थिती असली तरी पुन्हा सर्व सुरळीत होईल. कंपनीची साथ सोडणार नाही. एसबीआयने निधी देण्याचे आश्वासन दिले पण निधी उपलब्ध करून दिला नाही. काही कर्मचाºयांना त्रिवेंद्रममधून मुंबईत कामाला बोलावण्यात आले होते. त्यांच्याकडे राहण्याचे पैसे देण्यासाठी व घरी जाण्यासाठीदेखील पैसे नाहीत. अशी दुर्दैवी वेळ कोणावरही येऊ नये.
- प्रतीक्षा शेट्टी, कर्मचारी
>लग्न होऊन दोन महिन्यांत नोकरी गेली
जेटमध्ये नोकरीला आहे.
दोन महिन्यांपूर्वी लग्न
झाले आहे. पण नवीन आयुष्याची सुरुवात केलेली असताना
नोकरी गमावण्याची वेळ आल्याने चिंता आहे. कंपनी लवकर सुरू
व्हावी जेणेकरून आयुष्य सुरळीत होईल.
- नरेश घाडगे
>मतदानावर बहिष्कार
सरकारला आमची काहीही काळजी वाटत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा व मतदान केल्यास ‘नोटा’ वापरण्याचा विचार सुरू आहे. पीएमओला याबाबत टिष्ट्वट केले आहे. कर्मचाºयांत भीतीचे वातावरण असल्याने ‘उरी’ व इतर चित्रपट दाखविले जात आहेत. जेट प्रिव्हिलेज प्रवाशांकडे मदतीसाठी विचारणा केली आहे.
- प्रथमेश बेल्हेकर, वरिष्ठ कस्टमर
सर्व्हिस असोसिएट्स
>बुरा वक्त चला जाएगा
प्रत्येकाच्या जीवनात वाईट काळ
येत असतो. जेटचा सध्याचा काळ वाईट आहे. मात्र हा काळ निश्चितपणे दूर होईल व जेटला पुन्हा चांगले दिवस येतील.
मी दीड वर्षापासून जेटमध्ये ग्राउंड स्टाफ
म्हणून कार्यरत आहे. वाईट काळात
जेटसोबत निष्ठेने राहणार आहे.
एव्हिएशन क्षेत्रात कार्यरत राहण्याचाच मनोदय आहे.
- श्रीष्ठा, कर्मचारी