स्वयंचलित लोकलचा दरवाजा बंद होईना

By admin | Published: May 28, 2015 12:51 AM2015-05-28T00:51:54+5:302015-05-28T00:51:54+5:30

स्वयंचलित दरवाजात तांत्रिक बिघाड झाला असून २१ मेपासून दरवाजा बंद होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याकडे खुद्द पश्चिम रेल्वे प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे.

Automatic locale shutdown | स्वयंचलित लोकलचा दरवाजा बंद होईना

स्वयंचलित लोकलचा दरवाजा बंद होईना

Next

मुंबई : लोकलमधून पडणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने डब्यांना स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकलच्या महिला डब्याला स्वयंचलित दरवाजा बसविण्यात आला आणि ही लोकलही धावू लागली. मात्र आता या डब्याला असलेल्या स्वयंचलित दरवाजात तांत्रिक बिघाड झाला असून २१ मेपासून दरवाजा बंद होत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याकडे खुद्द पश्चिम रेल्वे प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे.
लोकलमधून प्रवास करताना प्रचंड गर्दीत काही प्रवासी लोकलच्या दरवाजाजवळ लटकून प्रवास करतात. मात्र हा प्रवास काही वेळेला जिवघेणा ठरतो. अशा प्रवाशांचा तोल जातो आणि यात त्यांचा मृत्यू होतो. यात महिला प्रवाशांचे अपघात सर्वात जास्त होत असल्याने स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पश्चिम रेल्वे मार्गावर एका लोकलच्या महिलांच्या एका फर्स्ट क्लास डब्याला स्वयंचलित दरवाजा बसविण्यात आला. मार्च २0१५ मध्ये हा दरवाजा बसविण्यात आल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी झाली. मात्र त्यानंतर या स्वयंचलित दरवाजाकडे खुद्द पश्चिम रेल्वेकडूनच दुर्लक्ष करण्यात आले. २१ मे पासून या स्वयंचलित दरवाजात बिघाड झाला असून तो बंदच होत नसल्याचे समोर आले आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल कारशेडमध्येही नेण्यात आली. मात्र दुरुस्ती होत नसल्याने अखेर हा दरवाजा उघडाच ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Automatic locale shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.