मुंबई :मुंबईत शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे ४ यादरम्यान सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला आहे. दहिसर, चेंबूर, विक्रोळी, कांदिवली, मरोळ, बोरिवली, वरळी आणि फोर्ट परिसरातील मुंबई महापालिका मुख्यालयावर असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये तब्बल २०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. सर्वाधिक म्हणजे २२६.८२ मिलिमीटर इतका पाऊस दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदविण्यात आला.
ठाणे - संरक्षक भिंती, घरांची, झाडांची पडझड, वाहनांसह मालमत्तेचे मोठे नुकसान, रेल्वे विस्कळीत, प्रवाशांचे हाल
नवी मुंबई - गाढी, कासाडी नद्या धोक्याच्या पातळीलगत, रूग्णांसह कर्मचाऱ्यांचीही दैना, भुयारी मार्गात साचले पाणी, ठिकठिकाणी झाडे कोसळली.
पालघर - सूर्या, वैतरणा देहर्जा, पिंजाळ, तानसा, सुसरी नद्यांना पूर, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले, सफाळे-नंदाडे भागात अडकलेल्या सुमारे ५० नागरिकांची सुटका, पालघर, बोईसर, विरार येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी
रायगड - कार्ले, मुळे गावांमध्ये घरात पाणी, मासेमारीवर परिणाम, रस्ते वाहतूक खोळंबली