Join us

दररोज सरासरी ५० मुंबईकरांना ‘ब्रेनस्ट्रोक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 3:08 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण : केवळ १० टक्के मुंबईकर वेळीच होतात रुग्णालयात दाखल

मुंबई : मुंबई स्ट्रोक सोसायटीच्या अहवालानुसार, सरासरी ५० मुंबईकरांना रोज ब्रेनस्ट्रोक होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अहवालानुसार, केवळ १० टक्के मुंबईकर वेळेवर रुग्णालयात दाखल होत असल्याचेही समोर आले आहे. शहर उपनगरात जवळपास महिन्याला दोन हजार मुंबईकरांना ब्रेनस्ट्रोक होत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.

मुंबई स्ट्रोक सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय तज्ज्ञांनी ही माहिती सादर केली. या अहवालानुसार, १०८ रुग्ण वाहिका ब्रेनस्ट्रोक आलेल्या रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करत असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे. त्यात मुंबईत ११२ रुग्णवाहिका असून २३० वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी आहेत. या रुग्णवाहिकांना सरासरी १८.७५ मिनिटे ब्रेनस्ट्रोक आलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी लागतात, तर रुग्णाला रुग्णालयात पोहोचविण्याची सरासरी वेळ २६.२५ मिनिटे आहे. या रुग्णवाहिकेतील कर्मचारीच पहिले प्रतिसादकर्ते असतात, असे या अहवालात नमूद आहे.

स्ट्रोक ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. स्ट्रोकची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि स्ट्रोक झाल्यावर केली जाणारी तत्काळ उपाययोजना याविषयी जनजागृतीचा अभाव असतो. जागतिक आकडेवारीनुसार, प्रतिवर्षी जगात २ कोटी लोकांना स्ट्रोकची बाधा होते. भारतात हे प्रमाण हळुवारपणे वाढत आहे. मलेरिया, क्षयरोग, एचआयव्ही-एड्सच्या तुलनेत ब्रेनस्ट्रोकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. जीवनशैलीत बदल आणि थोडा व्यायाम करून या दोन्हींवर नियंत्रण मिळवता येते असे मेंदूविकारतज्ज्ञडॉ. गौरांश जैन यांनी सांगितले.पक्षाघाताचे प्रकारच्पक्षाघाताचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे. हा अडथळा रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेल्या रक्ताच्या गुठळीमुळे होतो. (थ्रॉम्बॉसिस) तर काही वेळा हृदय किंवा मानेतील रक्तवाहिन्यांमध्ये तयार झालेली गुठळी मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये येऊन अडकते. (एम्बॉलिझम) आणि मेंदूचा रक्तपुरवठा खंडित करते. या दोन्ही प्रकारांमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील अडथळा पक्षाघातास कारणीभूत ठरतो. अशा प्रकारच्या पक्षाघातात लक्षणे दिसल्यानंतर तीन ते साडेचार तासांत गुठळ्या विरघळण्याची औषधे (थॉम्बोलिसिस) एमआरआय किंवा सीटी स्कॅनच्या चाचणीनंतर दिल्यास रक्तपुरवठा पूर्ववत होऊन मेंदूचे कार्य सुरळीत चालू शकते. अशा प्रकारच्या कारणास्तव झालेल्या पक्षाघाताचा झटका जर आला तर पहिले तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असतात, त्याला ‘गोल्डन अवर’ असे म्हणतात.च्पक्षाघाताच्या दुसºया प्रकारात मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे मेंदूच्या पेशीवरील दाब वाढतो. मेंदूमधील अंतर्गत रक्तस्राव, उच्च रक्तदाब किंवा रक्तवाहिन्यांच्या दोषामुळे ती फुटून होतो. या प्रकारात रक्तवाहिन्यांमधील गुठळी कारणीभूत न ठरता अंतर्गत रक्तस्रावामुळे रुग्णांना पक्षाघाताची लक्षणे दिसतात. या प्रकाराच्या पक्षाघाताच्या उपचारात थ्रॉम्बेलिसिसचा रोल नाही.पक्षाघाताने त्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयाचा रक्तपुरवठा कमी झाला तर ‘हार्टअ‍ॅटॅक’ येतो, त्याचप्रमाणे पक्षाघात किंवा ‘ब्रेनस्ट्रोक’ मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतो. मेंदूच्या चेतापेशींना आॅक्सिजन व ग्लुकोजचा पुरवठा नियमित होणे आवश्यक असते. रक्तपुरवठा थांबला तर या पेशी ज्या अवयवांचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालीवर परिणाम होतो. पक्षाघाताच्या आजारावर नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहे, वेळीच उपचार घेतले तर रक्तपुरवठा पूर्ववत होऊ शकतो, असे डॉ. शैलेश निरंजन यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई