Join us

सरासरी दरदिवशी अकरा मुंबईकर मिळवितात मतदार यादीतील उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 2:14 AM

माहिती अधिकारात उघड : महापालिकेतील तीन वर्षांची आकडेवारी

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांसाठी वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून, मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदार यादीतील उतारा महत्त्वाचा आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये एकूण १२ हजार ४८६ मतदार उतारा वितरित करण्यात आले आहेत. म्हणजेच दरदिवशी सरासरी अकरा मुंबईकर मतदार यादीतील उतारा मिळवित असल्याची माहिती कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून मिळविली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक खात्याकडे मागील ३ वर्षांत मतदार यादीतील नावाच्या उताऱ्यासाठी प्राप्त झालेल्या शुल्काची माहिती गलगली यांनी विचारली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक खात्याचे प्रशासकीय निवडणूक अधिकारी यांनी त्यांना असे कळविले की, २०१६-२०१७ या वर्षात एकूण ४ हजार १२१ उतारे देण्यात आले असून, एकूण शुल्क ४ लाख ९८ हजार ४६१ प्राप्त झाले आहे. २०१७- २०१८ या वर्षामध्ये ४ हजार १३५ मतदार उताºयासाठी एकूण ५ लाख ९० हजार ३३६ रुपये इतके शुल्क प्राप्त झाले आहे, तर २०१८-२०१९ या कालावधीत ४ हजार २३० मतदार उतारे देण्यात आले आहे़ यासाठी मुंबई महानगरपालिकेने ७ लाख ४७ इतकी रक्कम शुल्क म्हणून वसूल करण्यात आली आहे.

असा आहे तपशीलनिवडणूक खात्याने गलगली यांना असे कळविले आहे की, १९६०, १९६७, १९७२, १९७८, १९८५, १९९२, १९९७, २००२, २००७, २०१२,२०१७ सालची मतदार यादी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत नागरिकांना मतदार यादी तपासणीसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात आणि नागरिकांनी मागणी केल्यास मतदार यादीचा उतारा शुल्क आकारून देण्यात येतो. १९६०, १९६७ आणि १९७२ मतदार यादीतील काही पुष्ठे लाखो नागरिकांनी हातळल्यामुळे दुुरवस्थेत आहे. १९७८, १९८५, १९९२, १९९७, २००२, २००७, २०१२, २०१७ सालच्या मतदार याद्या त्या वेळेच्या सार्वत्रिक विधानसभा यादीवरून तयार करण्यात आल्या आहेत.