अविनाश भोसले यांचा पुत्र ‘ईडी’च्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:07 AM2021-02-12T04:07:38+5:302021-02-12T04:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्त वसुली संचालनालयाने त्यांची पुण्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सक्त वसुली संचालनालयाने त्यांची पुण्यातील कार्यालये व घरावर छापे टाकत त्यांचे पुत्र अमित भोसले यांना पुण्यातून ताब्यात घेऊन मुंबईत आणले. बिलार्ड पियार्ड येथील कार्यालयात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
अमित भोसले हे महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे आहेत. अविनाश भोसले व त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ‘ईडी’च्या रडारवर आहेत. परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. बुधवार (दि. १०)पासून त्यांच्या पुण्यातील घरी व कार्यालयावर छापेमारी सुरू होती. बुधवारी रात्री अधिकाऱ्यांनी अमित भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन मुंबईला आणले.