नोटाबंदीनंतर राज्यातील ३१७ कारखान्यांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:00 AM2020-03-03T06:00:42+5:302020-03-03T06:00:46+5:30

कामगार आयुक्तांच्या अहवालानुसार २०१७-१८ या काळात ३१७ कारखाने बंद झाले. १४,७८७ कामगार बाधित झाल्याचे लेखी उत्तर सुभाष देसाई यांनी दिले.

Avoid 3 factories in the state after demonetisation | नोटाबंदीनंतर राज्यातील ३१७ कारखान्यांना टाळे

नोटाबंदीनंतर राज्यातील ३१७ कारखान्यांना टाळे

Next

मुंबई : केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटबंदी लागू केल्यानंतर राज्यातील ३१७ कारखाने बंद झाले. त्यामुळे १४ हजार ७८७ कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. अनंत गाडगीळ, रामहरी रुपनवर, हुस्नबानु खलिफे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कामगार आयुक्तांच्या अहवालानुसार २०१७-१८ या काळात ३१७ कारखाने बंद झाले. १४,७८७ कामगार बाधित झाल्याचे लेखी उत्तर सुभाष देसाई यांनी दिले.
१४,५९१ शेतकऱ्यांची आत्महत्या
राज्यात आॅक्टोबर २०१४ ते आॅगस्ट २०१९ या कालावधीत एकूण १४ हजार ५९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली.
काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. आत्महत्येच्या १४,५९१ प्रकरणांपैकी ८,९४७ आत्महत्येची प्रकरणे मदतीस पात्र ठरली. तर, ५,४३० प्रकरणे अपात्र आहेत. २१४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये सुमारे ९ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न रणपिसे यांनी उपस्थित केला होता. यावर, अशा प्रकारे गैरव्यवहार झाला नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Avoid 3 factories in the state after demonetisation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.