Join us

उत्सव साजरे करताना कोरोनाचा संसर्ग टाळा : अंनिस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 2:46 PM

गणेशोत्सव पर्यावरपूरक साजरा करा.

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरपूरक साजरा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने केले आहे. केवळ गणेशोत्सव नाही तर बकरी ईदसह या काळातील उत्सव साजरे करताना प्रत्येकाचा आदर राखला जाईल याची काळजी घ्यावी, असे समितीने म्हटले आहे. उत्सव साजारा करताना संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्रात १ कोटीपेक्षा जास्त कुटूंबात श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी कोरोनाचा विचार करता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना गणेश भक्तांनी वनस्पती रंगाने रंगविलेल्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठानपना करावी. मूर्तीचे विसर्जन घरीच बादलीमध्ये करावे. ते पाणी झाडांना घालावे. असे केल्याने जलप्रदूषण टाळता येईल.

बकरी ईदनिमित्त रक्तदान करावे. महाराष्ट्र अंनिस मुस्लिम सत्यशोधक मंडळ रक्तदानास प्रोत्साहन देत आहे. यावर्षी अनेक जिल्हयांत मुस्लिम समाजातील युवांच्या मदतीने रक्तदानाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनामुळे आपण आर्थिक संकटात आहोत. अशावेळी आपण अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळला पाहिजे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करत सण उत्सव साजरे करा. निर्माल्य दान करा. विसर्जित मूर्ती दान करा, असे आवाहन समितीने केले आहे. विशेषत: जल प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती बादलीत विसर्जित करा. शिवाय उत्सव साजरे करताना नियम, शिस्त पाळा. त्यामुळे कोरोनाच्या संकटाला आणखी आळा घालता येईल, असे समितीने म्हटले आहे.--------------------------

महापलिएकेच्या काही सूचना...

  • कोरोना, मलेरिया, डेंग्‍यू, इत्‍यादी आजार आणि त्‍यांचे प्रतिबंधात्‍मक उपाय तसेच स्‍वच्‍छता याबाबत जनजागृती करावी.
  • गणपती मंडपांमध्‍ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्‍क्रीनिंगची पर्याप्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.
  • श्रींच्‍या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्‍यात येऊ नयेत.
  • कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्‍यासाठी प्रसाद वाटणे / फूले व हार अर्पण करणे इत्‍यादी बाबींस आळा घालावा.
  • कोरोना विषाणुची गंभीर आपत्‍ती लक्षात घेता मंडप सजावट / रोषणाई / देखावे करु नयेत.
  • नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाण्याचे शक्यतो टाळावे.
  • शक्यतो  लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

 

 

टॅग्स :गणेशोत्सवमहाराष्ट्रमुंबईमुंबई महानगरपालिका