Join us  

‘संस्काराचे मोती’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

By admin | Published: May 12, 2016 2:29 AM

‘लोकमत संस्काराचे मोती’ या उपक्रमांर्तगत २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांचा गुणगौरव, तसेच पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी सानपाडा येथे मोठ्या उत्साहात

नवी मुंबई : ‘लोकमत संस्काराचे मोती’ या उपक्रमांर्तगत २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेतील भाग्यवान विजेत्यांचा गुणगौरव, तसेच पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी सानपाडा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई आदी परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील लकी ड्रॉ विजेत्यांना प्रथम क्रमांकास लॅपटॉप, द्वितीय क्रमांकास टॅब, तृतीय क्रमांकास स्मार्ट फोन तर चौथ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.भाग्यवान विजेत्यांमध्ये सुमित सावंत, रितेश खडांगळे, साक्षी मांडवाकर, विनय भगत या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले, तर तन्वी पडवळ, अक्षत जाधव, ऐश्वर्या शिंदे, अथर्व पाटील या द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. तृतीय क्रमांक मिळविलेल्या कीर्ती नांदगावकर, मैत्रेयी जोशी, त्रिशा तिवारी, अंजली मोरले या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या देवेश गोतड, यश शिरसाठ, अस्मिता लटांबळे, निशाण पाटील यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देण्याकरिता पालकांनीही या ठिकाणी हजेरी लावली. या वेळी वितरण विभागाचे उपाध्यक्ष वसंत आवारे, ‘लोकमत’ समूहाचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, ‘लोकमत’ मुंबईचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, वितरण विभागाचे महाव्यवस्थापक हारून शेख, ठाणे विभागाचे वितरण महाव्यवस्थापक राघवेंद्र सेठ आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)