कोरोनाबाबत जनजागृती करा; नेटफ्लिक्ससह जिओचा रिचार्ज फ़्री मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:16 PM2020-04-04T15:16:16+5:302020-04-04T15:17:05+5:30
कोरोनाविरुद्धच्या लढ़यात घरात राहणाऱ्याना ६० जीबी इंटरनेटसह 'नेटफ्लिक्स, जिओ रिचार्ज फ़्रीच्या ऑफरचे संदेश तुम्हालाही येत असेल तर वेळीच सावध व्हा. ठगांकडून ऑफर, नागरिकांनो सतर्क रहा; सायबर पोलिसांचे आवाहन...
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ़यात घरात राहणाऱ्याना ६० जीबी इंटरनेटसह 'नेटफ्लिक्स, जिओ रिचार्ज फ़्रीच्या ऑफरचे संदेश तुम्हालाही येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण याच ऑफरच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचे सायबर पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्यानुसार सायबर पोलिसांकड़ून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गृहमंत्रालयाने ‘सायबर महाराष्ट्र’ला समाजमाध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेवून अफवा पसरविणाºयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबर महाराष्ट्रच्या राज्यातील प्रत्येक केंद्रांनी व्हॉटसअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्वीटर, टीकटॉक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, चुकीची माहिती किंवा संदर्भ पसरविणाºयांचा शोध घेत ३६ गुन्हे नोंदविले आहेत. यात २० प्रकरणांमध्ये व्हॉट्सअॅपचा तर तीन प्रकरणांमध्ये फेसबूकचा वापर करण्यात आला होता.
अशातच सायबर पोलिसांकड़ून या पार्श्वभूमिवर कोरोनाच्या काळात समोर येत असलेल्या तक्रारिंमध्ये, कोरोनाबाबत ८ मित्रांमध्ये जनजागृती केल्यास ६० जीबी इंटरनेट फ्री, नेटफ्लिक्स फ्री, तसेच जिओचा ४९८ चा रिचार्ज फ्रीच्या संदेशासह प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० मध्ये नोंदणी केल्यास बेरोजगाराना महिन्याला साडे तीन हजार रुपये असे संदेश धाडन्यात येत आहे. या संदेशाआड़ असलेली लिंक ओपन करण्यास सांगन्यात येते. लिंक उघड़ताच तुमची गोपनीय माहिती शेअर होत असल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे नागरिकांनी अशी अनोळखी लिंक, इंस्टॉल, डाउनलोड करू नये तसेच आपली गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नये असे आवाहन सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. कोरोनाबाबत समाजमाध्यमांवर प्राप्त मजकूर, छायाचित्र, ध्वनीचित्रफीतीची खातरजमा केल्याशिवाय पसरवू नये. शासकीय स्त्रोतांद्वारे प्राप्त माहितीवर विश्वाास ठेवावा किंवा खातरजमा करण्यासाठी शासकीय स्त्रोतांचा वापर करावा. समाजमाध्यमांद्वारे अन्य कोणी अफवा पसरवत असल्यास त्याची माहिती तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याला किंवा सायबर महाराष्ट्रला कळवावी, असेही सायबर पोलिसांकड़ून नमूद करण्यात येत आहे.