रेल्वे स्थानकावर कोरोनाबाबत जनजागृती, तिकीट तपासनीस करणार उद्घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 10:00 PM2020-07-10T22:00:48+5:302020-07-10T22:05:03+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना नेकबँड पोर्टेबल पब्लिक अ‍ॅड्रेस (पीए) प्रणाली दिली आहे.

Awareness about corona at the station, ticket inspector will announce | रेल्वे स्थानकावर कोरोनाबाबत जनजागृती, तिकीट तपासनीस करणार उद्घोषणा

रेल्वे स्थानकावर कोरोनाबाबत जनजागृती, तिकीट तपासनीस करणार उद्घोषणा

Next
ठळक मुद्देसध्या मध्य रेल्वेने ५० संच खरेदी केले असून, येत्या काही दिवसांत अन्य तिकिट तपासणी कर्मचार्‍यांनाही ते देण्यात येतील.

मुंबई : मध्य रेल्वेने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी नेकबँड पोर्टेबल पब्लिक अ‍ॅड्रेस म्हणजेच अत्याधुनिक लाऊड स्पीकर दिला आहे. याद्वारे तिकीट तपासनीस उद्घोषणा करून प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे, रांगेत चालण्याचे अशाप्रकारचे कोरोनापासून बचाव करण्याबाबत जागृती करणार आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना नेकबँड पोर्टेबल पब्लिक अ‍ॅड्रेस (पीए) प्रणाली दिली आहे. सध्या मध्य रेल्वेने ५० संच खरेदी केले असून, येत्या काही दिवसांत अन्य तिकिट तपासणी कर्मचार्‍यांनाही ते देण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांशी संवाद साधणे रेल्वे कर्मचार्‍यांना सोपे होईल. कोरोना संबंधीत तिकीट तपासणी करणार्‍या कर्मचार्र्‍यांनी दिलेल्या सूचना प्रवासी व्यवस्थित ऐकू शकतील. 

कोरोनाविरुध्दचा लढयात महत्वाची भूमिका बजावणार्‍या तिकीट तपासणी करणार्‍या कर्मयार्‍यांना सर्व संभाव्य सुरक्षा सामग्रीने सज्ज ठेवल्यास त्यांना भीती न बाळगता आपले कर्तव्य पार पाडण्यास मदत होईल. रेल्वेकडून त्यांना सर्व सुरक्षा सामग्री पुरविण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोएल यांनी दिली. 

संसर्ग होण्याचा धोका असताना सुद्धा तिकिट तपासणी कर्मचारी सेवा देतात. प्रवाशांना अनेक प्रकारची मदत करतात, लहान मुलांना रेल्वे डब्यात घेऊन जातात, ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक बोर्डिंगसाठी व्हील चेअरने नेण्यासाठी मदत करतात आणि काही वेळा गर्भवती महिलेस आवश्यक ती मदत करत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई विभागाच्या वाणिज्य शाखेने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना १ हजार २५० एन ९५ मास्क, १हजार २५० फेस शिल्ड, ५०० पीपीई किट, ७ हजार हेड कव्हर कॅप्स, हँड ग्लोव्हज आणि सॅनिटायझर्स उपलब्ध करून दिले आहेत.
 

आणखी बातम्या...

मनसैनिकांनी 'तो' स्टुडिओ फोडला; छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियनने दिला माफीनामा

...आधी नितीन गेला अन् आता सचिनही, पोलीस भावंडांचा पाठोपाठ मृत्यू

Gold Rate Today : सोन्याच्या दरात वाढ, पण चांदी घसरली, जाणून घ्या आजचे भाव

बिहारमध्ये चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

Vikas Dubey Encounter : उमा भारती म्हणाल्या, "मारेकरी ठार झाला, पण तीन गोष्टी रहस्यमय"

'एक शरद अन् शिवसेना गारद', पवारांच्या मुलाखतीवरून नारायण राणेंचा टोला

Web Title: Awareness about corona at the station, ticket inspector will announce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.