‘आगींच्या घटनांबाबत जनजागृती व्हावी’

By admin | Published: April 17, 2017 03:58 AM2017-04-17T03:58:30+5:302017-04-17T03:58:30+5:30

मुंबईतील लोकसंख्येची घनता, तसेच भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन महापालिकेचे अग्निशमन दल समर्थपणे मुंबईकर नागरिकांच्या संरक्षणाची

'Awareness about fire incidents' | ‘आगींच्या घटनांबाबत जनजागृती व्हावी’

‘आगींच्या घटनांबाबत जनजागृती व्हावी’

Next

मुंबई : मुंबईतील लोकसंख्येची घनता, तसेच भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन महापालिकेचे अग्निशमन दल समर्थपणे मुंबईकर नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळीत असून, आगीची एखादी घटना घडली, तर नागरिकांनीसुध्दा काय खबरदारी घेणे आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी, यासाठी अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. १४ ते २० एप्रिलदरम्यान अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त महापालिका मुख्यालय येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाद्वारे फाइव्ह गार्डन, एल.बी.एस. मार्ग- विक्रोळी अग्निशमन केंद्रापर्यंत ध्वज संचलन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका मुख्यालय येथून ध्वज फडकावून या रॅलीला मार्गस्थ केले, या वेळी ते बोलत होते.
सुरक्षा दलाचा वाद्यवृंद, मुंबई अग्निशमन दलाचे पहिले वाहन, पुणे अग्निशमन दलाचे वाहन, मुंबई अग्निशमन दलातील चार हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेले वाहन, फोम ट्रेडर वाहन, नियंत्रण कक्षाचे वाहन, जम्बो टँकर, १८ हजार लीटर पाणी क्षमतेचे टिस्को वाहन, श्वसन उपकरण वाहन, भाभा अणुऊर्जा केंद्राचे वाहन, ५५ मीटर उंच शिडीचे वाहन, भारतातील सर्वात मोठी उंचीची ब्रॉन्टो स्कॉय लिप्ट वाहन, भारतीय नौदलाचे अग्निशमन वाहन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन वाहन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे फायर फायटिंग वाहन, समुद्रात अडकलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक जेट किट वाहन या प्रकारातील स्वंयचलित वाहनाचा ताफा या रॅलीत सहभागी झाला होता. रॅलीदरम्यान मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्यात आली. (प्रतीनिधी)

Web Title: 'Awareness about fire incidents'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.