Join us

वेसावे गावात मास्क लावण्यासाठी जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:03 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या एप्रिल ते ऑगस्ट महिन्यांत वेसावे गाव आणि परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या एप्रिल ते ऑगस्ट महिन्यांत वेसावे गाव आणि परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. आता पुन्हा मुंबईत कोरोनाने डोके वर काढले आहे. नागरिक कोरोनाला अटकाव करणारे मास्क घालण्यात बेफिकीर असतात. तोंडावरचे मास्क हनुवटीवर येतात. त्यामुळे प्रभाग क्रमांक ५९ मधील नागरिकांमध्ये मास्क घालण्यासाठी जनजागृती करण्यासाठी शिवसेना शाखा क्रमांक ५९ च्या वतीने ‘मास्क लावा’ जनजागृती अभियान नुकतेच राबवण्यात आले. अशा प्रकारचा पश्चिम उपनगरातील हा पहिला उपक्रम असल्याचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी सांगितले.

स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब, महिला शाखासंघटक बेबी पाटील आणि महापालिका के पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात आले. तसेच खोजागल्लीसारख्या गजबजलेल्या वस्तीत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी उपविभागप्रमुख राजेश शेट्ये व महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात उपशाखाप्रमुख राजेश रासम, राजेश पुरंदरे, बब्बू चौधरी, शंकर डांगळे, अश्विनी पाटील, कांचन घाणेकर, युवा सेनेचे संदीप पडवळ, स्वप्नील शिवेकर आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

............................

---------------------------------------