अवीट गीतांनी बहरले वाचनालय..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:44 AM2017-08-02T02:44:00+5:302017-08-02T02:44:00+5:30
संगीताच्या दुनियेत नित्य नव्या गीतांची भर पडत असते; परंतु जुन्या काळातल्या मराठी गीतांची गोडी काही औरच आहे आणि त्या वेळची अवीट गाणी संगीत रसिकांच्या मनात आजही ठाण मांडून बसली आहेत.
मुंबई : संगीताच्या दुनियेत नित्य नव्या गीतांची भर पडत असते; परंतु जुन्या काळातल्या मराठी गीतांची गोडी काही औरच आहे आणि त्या वेळची अवीट गाणी संगीत रसिकांच्या मनात आजही ठाण मांडून बसली आहेत. याचीच प्रचिती माहीम सार्वजनिक वाचनालयात नव्याने आली. ज्येष्ठ संगीत अभ्यासक विद्याधर देसाई यांनी जुन्या काळातल्या मराठी गाण्यांचे ध्वनिमुद्रण ऐकवत वाचनालयात गीत-संगीताची बहार आणली.
सांस्कृतिक उपक्रमांचा एक भाग म्हणून माहीम सार्वजनिक वाचनालयाने हा दुर्मीळ योग घडवून आणत संगीत रसिकांना सूर-तालात चिंब भिजवले. कृष्णधवल काळातली मराठी चित्रपटगीते, भावगीते; तसेच गीतरामायण यांची मेजवानी धनंजय देसाई यांनी या उपक्रमात दिली.
प्रत्येक गाण्यासोबत त्या गाण्याविषयीची पूरक माहिती देत त्यांनी या गाण्यांची निर्मितीची
बाजूही उलगडून दाखवली.
ज्येष्ठ सतारवादक शंकर अभ्यंकर, संस्कृत अभ्यासिका कमल अभ्यंकर
आदी मान्यवरांसह संगीत
रसिकांनी या कार्यक्रमाच्या वेळी वाचनालयाचे सभागृह हाऊसफुल्ल केले होते.