झाडांवर कुऱ्हाड, रस्त्यांसाठी मुंबई महापालिका तोडणार १२०० झाडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 10:22 AM2022-03-29T10:22:39+5:302022-03-29T10:23:13+5:30

नागरिकांनी प्रशासनाकडे नोंदविल्या हरकती

Ax on trees, 1200 trees to be cut by Mumbai Municipal Corporation for roads? | झाडांवर कुऱ्हाड, रस्त्यांसाठी मुंबई महापालिका तोडणार १२०० झाडे?

झाडांवर कुऱ्हाड, रस्त्यांसाठी मुंबई महापालिका तोडणार १२०० झाडे?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रस्त्याच्या विविध प्रकल्पात बाधित झाडांची सर्रास कत्तल होत असते. आता गोरेगाव-  मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या मार्गात बाधित १२०० वृक्षांची कत्तल होणार आहे. या भागातील बाधित झाडांवर तशी नोटीस महापालिकेने लावल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप उसळला. त्यानुसार नागरिकांनी आपली हरकत नोंदविली आहे.

दरवर्षी मुंबईत महापालिकेमार्फत झाडे लावण्याचा संकल्प केला जातो. मात्र, त्या दुप्पट झाडे विविध प्रकल्पात बाधित ठरून त्यांची कत्तल होत असते. प्रकल्पात बाधित वृक्ष तोडण्यापूर्वी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. त्यानुसार या प्राधिकरणाने हिरवा कंदील दिल्याने गोरेगाव मुलुंड जोडरस्त्यात बाधित वृक्ष तोडले जाणार असल्याचे पालिका अधिकारी सांगतात. 

nप्रकल्पात २० वृक्ष बाधित असतील, तर १०० वृक्ष तोडण्याची परवानगी घेण्यात येते. नागरिकांनी हरकती घेतल्यावर ९० वृक्ष वाचवली असे भासविण्याचा येते, असे या हरकतींतून नागरिकांनी निदर्शनास आणले आहे. 
nरस्ता रुंदीकरण, नवीन रस्ता बांधणे या प्रकल्पांसाठी नागरिकांच्या करातून मिळणारा पैसा वापरला जातो. त्यामुळे या कामासाठी घेण्यात आलेल्या पर्यावरणीय परवानगी, झाडांची कत्तल, पर्यावरणाचे नुकसान ही सगळी माहिती लोकांसाठी जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

Web Title: Ax on trees, 1200 trees to be cut by Mumbai Municipal Corporation for roads?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.