Join us

Ayodhya Verdict - पुन्हा अयोध्येला जाणार - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 4:24 AM

आता आगामी २४ तारखेलाही मी तिथे जाईन, असे ते पत्र परिषदेत म्हणाले.

मुंबई : राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा हिंदूंच्या श्रद्धेला न्याय देणारा असून त्यासाठी मी न्यायदेवतेला साष्टांग दंडवत घालतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. आपण गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन राम मंदिर उभारणीचा निर्धार केला होता. आता आगामी २४ तारखेलाही मी तिथे जाईन, असे ते पत्र परिषदेत म्हणाले.आज न्यायदेवतेने दिलेला न्याय सर्वांनी स्वीकारला आहे, ही आनंदाची बाब आहे. हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तसेच विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, प्रमोद महाजन-मुंडेंची अन् विशेषत: राम मंदिरप्रश्नी रथयात्रा काढणारे लालकृष्ण अडवाणी यांची मला आठवण होत आहे. राम मंदिर आंदोलनातील योगदानासाठी अडवाणींना अभिवादन करण्यासाठी मी लवकरच त्यांना भेटणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.आजच्या निर्णयाचा आनंद साजरा करा, पण वेडेवाकडे काहीही करू नका, असे मी शिवसैनिकांना सांगितले आहे. गेल्या वर्षी मी अयोध्येला जाताना शिवनेरीवरील माती घेऊन गेलो होतो. त्या मातीने चमत्कार केला आणि आज राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा मी शिवनेरीवर जाईन, असे उद्धव म्हणाले. आजच्या निर्णयात केंद्र सरकारचे योगदान किती यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे आभारच मानले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.>न्याय सर्वांनी स्वीकारलाआजच्या निर्णयाचा आनंद साजरा करा पण वेडेवाकडे काहीही करू नका, असे मी शिवसैनिकांना सांगितले आहे. आज न्यायदेवतेने दिलेला न्याय सर्वांनी स्वीकारला आहे, ही खरोखरच आनंदाची बाब आहे.

टॅग्स :अयोध्याउद्धव ठाकरेशिवसेनासर्वोच्च न्यायालय