आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालयांना दिलासा नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 12:40 AM2019-10-06T00:40:38+5:302019-10-06T00:40:48+5:30
आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रियेसाठी असलेले नियम शिथिल करणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
मुंबई : आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रियेसाठी असलेले नियम शिथिल करणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सध्याच्या नियमानुसार, ज्यांना आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा आहे त्यांना नॅशनल एलिजीबीलिटी कम इन्ट्रन्स टेस्टमध्ये ५० टक्के गुण मिळणे बंधनकारक आहे. आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयांच्या निम्म्याहून अधिक जागा या नियमांमुळे रिक्त राहत असल्याने हा नियम शिथिल करावा, अशी मागणी या महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे.
सेंट्रल कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसिन (सीसीआयएम) हे इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिल (आयएमसीसी) अॅक्ट १९७० नुसार नाही, असे सांगितले. मात्र मेडिकल कौन्सिलने सर्व नियम आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच तयार केले आहेत. त्यासाठी आम्ही हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.