आझाद यांची नजरकैद म्हणजे भाजपाची हुकूमशाही; रिपब्लिकन गटांसह विरोधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 02:21 AM2018-12-30T02:21:49+5:302018-12-30T02:23:01+5:30

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर (रावण) आझाद यांना पोलिसांनी मालाडमधील हॉटेलमध्ये शनिवारी नजरकैदेत ठेवत त्यांची वरळीतील सभा रोखल्याने रिपब्लिकन गटांसह विरोधकांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे.

Azad's detention means dictatorship of BJP; Opponents criticize with Republican groups | आझाद यांची नजरकैद म्हणजे भाजपाची हुकूमशाही; रिपब्लिकन गटांसह विरोधकांची टीका

आझाद यांची नजरकैद म्हणजे भाजपाची हुकूमशाही; रिपब्लिकन गटांसह विरोधकांची टीका

Next

मुंबई : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर (रावण) आझाद यांना पोलिसांनी मालाडमधील हॉटेलमध्ये शनिवारी नजरकैदेत ठेवत त्यांची वरळीतील सभा रोखल्याने रिपब्लिकन गटांसह विरोधकांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे. पोलीस बळाचा गैरवापर करून दडपशाही करणारा भाजपा हा हुकूमशाही राबवत असल्याची
टीका करत विविध राजकीय
नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी जाणाऱ्या आझाद यांना शुक्रवारी अटक करण्यात आल्याचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे प्रवक्ते अविनाश महातेकर यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, सुरक्षेसाठी पोलिसांकडून होणाºया उपाययोजना योग्य असल्या तरी आझाद
यांची अटक चुकीची, निषेधार्ह आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आझाद यांची नजरकैद म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आव्हाड यांनी मालाड येथील हॉटेलवर जाऊन आझाद यांची भेट घेतली. या वेळी ते म्हणाले की, सरकार अशा प्रकारे विरोधकांचा आवाज दाबणार असेल, तर भविष्यात त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल. विरोधकांचा आवाज अशा प्रकारे दाबता येणार नाही. सभेला परवानगी नाकारल्यानंतरही सरकारने आझाद यांना चैत्यभूमीवर जाण्यापासून रोखले, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपमान असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
लाल बावट्याचे मुंबई जिल्हा सचिव किशोर कर्डक यांनीही आझाद यांच्या अटकेचा निषेध व्यक्त करत देशात अघोषित आणीबाणी असल्याची टीका केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनीही सरकारने आझाद यांना नजरकैदेत ठेवण्याचा जाब विचारला. सरकार जाणूनबुजून तणाव वाढवत असल्याचा आरोपही कवाडे यांनी केला.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघच मुख्य सूत्रधार’
भाकपाचे महाराष्ट्र सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रकाश रेड्डी यांनीही आझाद यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याबाबत तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड केल्याबद्दल सरकारवर सडकून टीका केली आहे. रेड्डी म्हणाले की, धर्मांध शक्तींना सरकारने मोकळे सोडले असून लोकशाही मार्गाने सभा घेण्याच्या इतरांच्या अधिकारावर मात्र गदा आणली जात आहे. ही हुकूमशाही मोडून काढू. निवडणुकांआधी दंगली घडवण्याचा सरकारचा डाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामागील सूत्र हलवत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Web Title: Azad's detention means dictatorship of BJP; Opponents criticize with Republican groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई