Join us

'मुली एक-दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहतात अन् बिनसलं की बलात्काराची तक्रार करतात'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 7:17 PM

भिवंडीत सिपीएस स्कुलचे उदघाटन संपन्न 

ठळक मुद्देशाळेच्या उदघाटना प्रसंगी सिपीएस शाळेच्या माहिती पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिपीएस शाळा आझमगड उत्तरप्रदेश येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १६ ) सरकारी शाळांमध्ये गरिबांना योग्य व दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने सरकार गरिबांना दर्जेदार शिक्षण देण्यास असमर्थ असल्याची प्रतिक्रिया समाजवादीचे नेते तथा आमदार आबू आसिम आझमी यांनी भिवंडीत सिपीएस स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिलान्यास उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आयोजित व्यक्त केली. याप्रसंगी सेंट्रल पब्लिक स्कुल शाळेचे संस्थापक अयाज अहमद खान, माजी खासदार संतोष सिंग, आमदार महेश चौघुले, आमदार रईस शेख, माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, समाज कल्याण न्यासचे संस्थापक डॉ सोन्या पाटील, जिप सदस्य गोकुळ नाईक, उत्तर प्रदेश येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीशबी डी नक्वी, पंचायत समिती सभापती ललिता पाटील , पंस सदस्या नमिता पाटील , काँग्रेस कार्यकर्ते रमेश भगत, उद्योगपती नवलकिशोर गुप्ता, संदेश पाटील यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या शाळेच्या उदघाटना प्रसंगी सिपीएस शाळेच्या माहिती पुस्तकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिपीएस शाळा आझमगड उत्तरप्रदेश येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी आबू आसिम आझमींना पत्रकारांनी सध्या चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड व पूजा चव्हाण आत्महत्या प्रकारणाबद्दल विचारले असता, आझमी यांनी देशात लिव्ह अँड रिलेशनशीप कायदा अतिशय घातक असून एक दोन वर्ष मुली व महिला लिव्ह अँड रिलेशनच्या नावाने पर पुरुषाबरोबर राहतात व नंतर त्यांच्यात बिनसले की बालात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल करून एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उध्वस्त करतात, असे म्हटले. तसेच, हा कायदाच चुकीचा असून मीडियाने देखील बलात्कार प्रकरणाचे वार्तांकन करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया आमदार आबू आसिम आझमी यांनी याप्रसंगी दिली.  

टॅग्स :अबू आझमीठाणेभिवंडी