मुंबई ‘बी’ वार्ड'; व्यापार-उदिमाचे मुख्य केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:40 AM2023-12-16T10:40:42+5:302023-12-16T10:42:32+5:30

देशाच्या व मुंबईच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र. व्यापार आणि उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणावर येणारे व्यापारी.

'B' Ward is the main center of trade and industry in mumbai | मुंबई ‘बी’ वार्ड'; व्यापार-उदिमाचे मुख्य केंद्र

मुंबई ‘बी’ वार्ड'; व्यापार-उदिमाचे मुख्य केंद्र

मत्स्य व्यवसायाचे मोठे केंद्र असलेला भाऊचा धक्का, व्यावसायिक जहाजे तसेच मत्स्य व्यावसायिक बोटींचे प्रमुख केंद्र असलेले मालेत बंदर, पोर्ट ट्रस्ट परिसर, मिनारा मशीद, मुघल मशीद, बाबा दर्गा यासारखी जुनी धार्मिक स्थळे. देशाच्या व मुंबईच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र. व्यापार आणि उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणावर येणारे व्यापारी. घनदाट लोकसंख्या, जुन्या दाटीवाटीच्या गल्ल्या,  घरगल्ल्या अरुंद असल्याने साफसफाईची समस्या. जुन्या -धोकादायक इमारतींची दुरुस्ती... अशी या वॉर्डाची मुख्य ओळख!

हद्द–पूर्व :

पी. डिमेलो मार्ग. पश्चिम-ईब्राहीम रहमतुल्ला रोड व अब्दुल रेहमान रोड. दक्षिण-लोकमान्य टिळक मार्ग. उत्तर-रामचंद्र भट्ट मार्ग, शिवदास चाप्सी रोड व जीनाबाई मुलजी राठोड.

वॉर्डाचे वैशिष्ट्य :

देशाच्या व मुंबईच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र. मोठ्या संखेने देशी-विदेशी पर्यटक विविध स्वरूपाच्या वस्तू खरेदीसाठी येथे येतात. या विभागात अनिवासी लोकसंख्या मोठी असून व्यापार आणि उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी इथे येतात. विभागात प्रामुख्याने हार्डवेअर व  इंजिनीअरिंग ,शालेय साहित्य, फटाके, प्रसिध्द व सुवासिक अत्तरे, धान्य-कडधान्ये , खरेदी- विक्री, कापड दुकाने, हॉटेल व्यावसायिक, मत्स्यव्यवसाय, मालाची दळणवळण, उद्योगधंदे. या विभागात घोषित झोपडपट्टी नाही. मात्र लहान गल्ल्या आणि १०० वर्षे जुन्या -मोडकळीस आलेल्या इमारतींची  संख्या मोठी. व्यापार-उद्योगाचे मुख्य केंद्र असल्याने मोठी आर्थिक उलाढाल. उद्योगांसाठी कच्चा माल पुरवणारे मुख्य केंद्र.

हा विभाग महापालिकेचा दुसऱ्या क्रमांकाचा जुना विभाग आहे. या भागत विविध जाती-धर्माचे लोक राहतात. व्यापार-उद्योगाची सांगड घातली गेल्याने हा विभाग आर्थिकदृष्ट्या प्रगतिपथावर आहे. या विभागात सर्व प्रकारचे सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. ईदसाठी मुंबई व मुंबई बाहेरून मोठ्या प्रमाणावर लोक मोहम्मद अली रोड, मिनारा मशीद व झकेरिया मशीद येथे येतात. हा विभाग मुंबईचा महत्त्वाचा विभाग आहे. - उद्धव बापू चंदनशिवे, सहायक पालिका आयुक्त  


महत्त्वाची पर्यटन स्थळे :

धार्मिक स्थळे – केशवजी नाईक रोड येथील जलकारंजा (ऐतिहासिक वास्तू), बाबा दर्गा, १९१८ सालापासूनचे जुने प्रार्थनास्थळ, भाऊचा धक्का (मत्स्य व्यवसायाचे मोठे केंद्र), मालेत बंदर (व्यावसायिक जहाजे तसेच मत्स्य व्यावसायिक बोटींचे प्रमुख केंद्र, मिनारा मशीद, मुघल मशीद, मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसर 

०४ डिस्पेन्सरी , ०२  महानगरपालिका  प्राथमिक आरोग्य केंद्रे.

वॉर्डातील मुख्य समस्या  :

घनदाट लोकसंख्या, जुन्या दाटीवाटीच्या गल्ल्या, जलवाहिन्या व इतर सुविधांचे मोठे जाळे. त्यांची देखभाल करणे आव्हानात्मक. मोठ्या वाहनतळांची कमतरता. लहान रस्ते आणि गल्ल्यांमुळे वाहतुकीची समस्या. अनधिकृत पार्किंग. घरगल्ल्या अरुंद असल्याने साफसफाईची समस्या. जुन्या धोकादायक 
इमारतींची दुरुस्ती.

Web Title: 'B' Ward is the main center of trade and industry in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.