Join us

बीए, बीकॉम, तर कोणी बीएस्सी; टिकाव, फावडे घेऊन दोस्ती ‘रोहयो’शी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 9:31 AM

हक्काचा शाश्वत रोजगार म्हणून रोजगार हमी योजना अनेकांना आधार ठरली आहे.

मुंबई :

हक्काचा शाश्वत रोजगार म्हणून रोजगार हमी योजना अनेकांना आधार ठरली आहे. पूर्वी बेकारांना रोजगार मिळायचा. मात्र, आता रोहयोत  बीए, बीकॉम झालेलेही टिकाव, फावडे घेऊन काम करत आहेत. रोहयोशी दोस्ती करून काहींनी शिक्षण तर काहींनी घराला आर्थिक मदत उभी केली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी एक कि.मी.ची पायपीट   योजनेत काम करताना कधी जंगल तर कधी ओसाड रान वाटेत रस्ता दुरुस्तीची कामे करावी लागतात.  अशावेळी जवळ गाव नसेल तर खूप आबाळ होते.  माथ्यावर तापू लागले की, जवळ असलेले पाणी संपते. पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी खूप पायपीट करावी लागते असे ठाण्यातील एका कामगाराने सांगितले.

डिग्री घेतली, पोटासाठी रोहयोची वाट पकडलीपीएचडी घेणारे यशवंत वाकडे ठाणे जिल्ह्यात योजनेत कामाला आहेत. त्यांचे गाव दुर्गम भागात असल्यामुळे तेथे अन्य रोजगार उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते योजनेत काम करतात.संजय शिंदे पालघरमध्ये राहतात. ते एमए शिकत आहेत. शिक्षण पूर्ण करताना ते रोहयो योजनेत काम करतात.

रोहयोवर १.७४ लाख कुटुंबांना रोजगार २०२१-२२ मध्ये २०.३६ लाख कुटुंबापैकी १.७४ कुटुंबांना १००  दिवसांचा रोजगार पुरविण्यात आला आहे. २०२०-२१ मध्ये ही संख्या १.३७ लाख होती.

राज्यात ८२५.४५ मनुष्य दिवस निर्मिती! रोहयो योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षात ८२५.४६ लाख मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. राज्यात निर्माण झालेल्या एकूण मनुष्य दिवस निर्मितीपैकी सर्वांत जास्त निर्मिती अमरावती जिल्ह्यात झाली आहे. त्याखालोखाल पालघर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात झालेली आहे.

४३.६२% महिलांचा सहभाग४२.९३% २०२०-२१४३.६२% २०२१-२२

महिला व पुरुषांमध्ये भेदभाव न ठेवता मजुरीचे दर समान ठेवण्यात आले आहेत. राज्यांमध्ये निर्माण झालेल्या एकूण मनुष्य दिवस निर्मितीमध्ये २०२०-२१ या वर्षात ४२.९३ टक्के तर २०२१-२२ मध्ये महिलांचा सहभाग ४३.६२ टक्के आहे.