बीए सत्र सहाची परीक्षा आजपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 06:43 AM2019-04-15T06:43:12+5:302019-04-15T06:43:21+5:30

मुंबई विद्यापीठाच्या २०१९च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बीए सत्र सहाची परीक्षा सोमवार, १५ एप्रिलपासून सुरूहोत असून, ती ७ मे, २०१९ पर्यंत चालणार आहे.

BA Season 6 Examination Today | बीए सत्र सहाची परीक्षा आजपासून

बीए सत्र सहाची परीक्षा आजपासून

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१९च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बीए सत्र सहाची परीक्षा सोमवार, १५ एप्रिलपासून सुरूहोत असून, ती ७ मे, २०१९ पर्यंत चालणार आहे.
तृतीय वर्ष बीए सत्र सहाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. १३,१६५ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, यात मुलींची संख्या अधिक म्हणजे ७,९४४ एवढी आहे, तर ७५:२५ या जुन्या अभ्यासक्रमानुसार १,२८८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हानिहाय विद्यार्थी संख्येनुसार ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे ५,१०१ विद्यार्थी परीक्षेस बसत आहेत. या जिल्ह्यातही विद्यार्थिनींची संख्या जास्त म्हणजे २,९९१ एवढी आहे. ही परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यातील एकूण १४७ परीक्षा केंद्रांवर होईल.
दरम्यान, परीक्षा वेळेवर सुरू करून परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
>बीए परीक्षेला बसणारे जिल्हानिहाय विद्यार्थी
जिल्हा विद्यार्थिनी विद्यार्थी एकूण
मुंबई शहर १,६५३ ६५९ २,३१२
मुंबई उपनगर ९२८ ३४४ १,२७२
ठाणे २,९९१ २,११० ५,१०१
रायगड ९८६ ७६८ १,७५४
रत्नागिरी ५६५ ५०९ १,०७४
सिंधुदुर्ग ३८९ ३९० ७७९
पालघर ४३२ ४४१ ८७३
एकूण ७,९४४ ५,२२१ १३,१६५

Web Title: BA Season 6 Examination Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा