मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१९च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बीए सत्र सहाची परीक्षा सोमवार, १५ एप्रिलपासून सुरूहोत असून, ती ७ मे, २०१९ पर्यंत चालणार आहे.तृतीय वर्ष बीए सत्र सहाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. १३,१६५ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, यात मुलींची संख्या अधिक म्हणजे ७,९४४ एवढी आहे, तर ७५:२५ या जुन्या अभ्यासक्रमानुसार १,२८८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हानिहाय विद्यार्थी संख्येनुसार ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे ५,१०१ विद्यार्थी परीक्षेस बसत आहेत. या जिल्ह्यातही विद्यार्थिनींची संख्या जास्त म्हणजे २,९९१ एवढी आहे. ही परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यातील एकूण १४७ परीक्षा केंद्रांवर होईल.दरम्यान, परीक्षा वेळेवर सुरू करून परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.>बीए परीक्षेला बसणारे जिल्हानिहाय विद्यार्थीजिल्हा विद्यार्थिनी विद्यार्थी एकूणमुंबई शहर १,६५३ ६५९ २,३१२मुंबई उपनगर ९२८ ३४४ १,२७२ठाणे २,९९१ २,११० ५,१०१रायगड ९८६ ७६८ १,७५४रत्नागिरी ५६५ ५०९ १,०७४सिंधुदुर्ग ३८९ ३९० ७७९पालघर ४३२ ४४१ ८७३एकूण ७,९४४ ५,२२१ १३,१६५
बीए सत्र सहाची परीक्षा आजपासून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:43 AM