बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:19 IST2025-01-06T17:16:35+5:302025-01-06T17:19:08+5:30

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी अपडेट दिली आहे.

Baba Siddique Case Why was Baba Siddiqui murdered? Big revelation from the police charge sheet | बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा

बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा

Baba Siddique Case : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला चार महिने उलटले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आता चार्जशीट दाखल केले आहे. या चार्जशीटमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण दिले आहे. सिद्दीकी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने दहशत माजवण्यासाठी संघटीत गुन्हेगारी सिंडीकेटच्या माध्यमातून केल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे. 

मुंबईत टोरेस कंपनीबाहेर गुंतवणूकदारांची गर्दी, हप्ते थकवले, मालक गायब? पोलीस बंदोबस्त!

पोलिसांनी या प्रकरणी ४,५९० पानांचे चार्जशीट दाखल केले आहे.  यामध्ये २९ जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या २६ आरोपींसोबत अनमोल बिश्नोईसह तीन तोडफोड करणाऱ्या आरोपींचाही यात समावेश आहे. आरोपपत्रानुसार, अनमोल बिश्नोईने भीती आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सिद्दीकीच्या हत्येचा कट रचला.
२६ जणांना अटक करण्यात आली आहे.

अनमोल बिश्नोई व्यतिरिक्त मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर हे अन्य वॉन्टेड आरोपी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २६ जणांना अटक केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

 माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे भागात त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांना अटक होईपर्यंत हत्येमागचं नेमकं कारण समोर येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दसऱ्याच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली. गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांना मृत घोषित केलं.

Web Title: Baba Siddique Case Why was Baba Siddiqui murdered? Big revelation from the police charge sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.