Baba Siddique :मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी (दि.१२) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला. अशातच लोक त्यांच्याशी संबंधित घटनांचीही चर्चा करत आहेत, त्यातील एक म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनेबाबा सिद्दिकी यांना एकदा धमकी दिली होती.
दाऊद इब्राहिमने बाबा सिद्दिकी यांना धमकी दिल्याचे वृत्त शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये प्रसिद्ध झाले होते. जमिनीच्या वादातून ही धमकी देण्यात आली होती. इब्राहिमचा जवळचा सहकारी अहमद लंगरा याच्याशी बाबा सिद्दिकी यांचे मुंबईतील एका जमिनीवरून भांडण झाले होते. त्यानंतर छोटा शकीलने बाबा सिद्दिकी यांना या प्रकरणापासून दूर राहा अन्यथा आपले नुकसान होईल, अशी धमकी दिली होती.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांचेही चांगले राजकीय संबंध होते. त्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अहमद लांगरा याला मकोका अंतर्गत अटक करून तुरुंगात पाठवले. यानंतर दाऊद इब्राहिमने बाबा सिद्दिकी यांना फोन करून राम गोपाल वर्मा यांच्याशी बोलून तुमच्यावर "एक था एमएलए" चित्रपट बनवेन, अशी धमकी दिली होती.
अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे डी कंपनीसोबतचे जुने संबंध आणि बाबा सिद्दिकी यांचे संजय दत्तसोबतचे संबंध यामुळे बाबा सिद्दिकीचे अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचे अनेकदा सांगण्यात येत होते. मात्र, दाऊद इब्राहिमसोबतही बाबा सिद्दिकी यांचा वाद झाला होता. हा वाद जमिनीवरून झाला होता.
हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हातशनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. ही हत्या लॉरेन्स बिश्नोई टोळीनं केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी घटनेच्या रात्रीच तीन आरोपींपैकी दोघांना पकडलं होतं, तर तिसरा आरोपी शिवा अद्याप फरार आहे. शिवा पुण्यात ५-६ वर्षे काम करत होता. तसेच याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत.