बाबाजी पाटील जिल्हा बँक अध्यक्ष

By Admin | Published: May 21, 2015 10:46 PM2015-05-21T22:46:49+5:302015-05-21T22:46:49+5:30

सहकार पॅनलमधील राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांची एका मतानेच निवड झाली आहे. अ

Babaji Patil District Bank President | बाबाजी पाटील जिल्हा बँक अध्यक्ष

बाबाजी पाटील जिल्हा बँक अध्यक्ष

googlenewsNext

ठाणे : वार्षिक सात हजार कोटींची उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अखेर सर्वपक्षिय सहकार पॅनलमधील राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांची एका मतानेच निवड झाली आहे. अखेरच्या क्षणापर्यन्त प्रचंड चुरशीची आणि उत्सुकतेची ठरलेल्या या निवडणुकीत
सहकारचा विजय झाल्यानंतर सर्वपक्षिय कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी या वेळी प्रथमच सामंजस्याची भूमिका घेतली. एरवी एकमेकांच्या विरोधात लढणारे पक्ष यावेळी मात्र एकमेकांच्या बरोबर आल्याचे चित्र बँकेच्या इतिहासात प्रथमच पहायला मिळाले. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना आणि काँग्रेस पुरस्कृत ‘सहकार पॅनल’चे बाबाजी पाटील तर वसई विकास आघाडी पुरस्कृत ‘लोकशाही सहकार’ पॅनलच्या शिवाजी शिंदे आणि निलेश भोईर यांनी अर्ज दाखल केला होता. यात शिंदेंनी माघार घेतल्यामुळे पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर भोईर यांच्या लढतीत पाटील यांना २१ पैकी ११ तर भोईरांना १० मते मिळाली.
उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत सहकारचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडांविरुद्ध ‘लोकशाही सहकार’चे जगन्नाथ चौधरी यांच्या लढतीत घोडांना ११ तर चौधरींना १० मते मिळाली. त्यामुळे अवघ्या एका मताने भोईर आणि चौधरींना पराभव पत्करावा लागला. गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ वा. पर्यन्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात अत्यंत शांततेत ही निवडणूक प्रक्रीया पार पडली.
पिठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जीवन गलांडे यांनी कामकाज पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष पाटील आणि उपाध्यक्ष घोडा यांचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, यांच्यासह सर्व संचालक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
(प्रतिनिधी)

बॅकेला गेली सात वर्ष उत्कृष्ट बॅकेचा पुरस्कार मिळाला आहे. आजही १०५ कोटींचा नफा आहे. सहकार पॅनलद्वारे जी जबाबदारी दिली आहे, ती चोखपणे बजावणार आहे. १०१ शाखांमधून बँकेचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी सर्व संचालक, कर्मचाऱ्यांशी सुसंवाद ठेवणार आहे. पालकमंत्री शिंदे, वसंतराव डावखरे, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, आ. किसन कथोरे, प्रमोद हिंदुराव आणि सहकारच्या सर्व संचालकांना या विजयाचे श्रेय आहे.
- बाबाजी पाटील,
अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

४बाबाजी पाटील हे यापूर्वी, २०११ मध्ये बँकेच्या अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यावेळी बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती.
४तर आता सर्वपक्षीय पॅनलच्या सहकारातून ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले आहेत.
४१९८६ ते २००८ या काळात बाबाजींचे वडील बा. का. पाटील हे बँकेवर संचालक होते. त्यांच्या निधनानंतर ९ जून २००९ मध्ये स्वीकृत संचालक म्हणून ते निवडून आले.
४२००९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले. याही वेळी (२०१५) त्यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
४१९८६ ते २००८ या २२ वर्षांच्या काळात बाबाजींचे पिताश्री बा. का. पाटील हे १९९९ ते २००५ असे चार वेळा अध्यक्ष होते. त्यामुळे बाबाजींच्या रुपाने एकाच घरात सहाव्यांदा अध्यक्षपद मिळाले .

वर्षभरासाठीच संधी
सर्वपक्षिय सहकार पॅनलच्या ११ पैकी दरवर्षी एकेकाला अशारितीने किमान पाच जणांना अध्यक्षपदाची व पाच जणांना उपाध्यक्षपदाची संधी द्यावी असा प्रस्ताव असल्याने बाबाजी व घोडा यांना हे पद एकच वर्ष मिळण्याची शक्यता आहे.
पराभव मान्य - ठाकूर
इंद्रजित पडवळ हे त्या पॅनलकडे गेले तरी सीपीएमचे रत्नाकर गिंभल आणि जगन्नाथ चौधरी हे दोघे लोकशाहीत आल्यामुळे इकडची संख्या १० झाली. त्यात फाटाफूट झाली नाही. केवळ बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्र आले, ही साधी बाब नाही.
आम्ही तडजोडी केल्या नाही. त्यामुळे पराभव मान्य आहे, अशी प्रतिक्रीया लोकशाही सहकारचे सर्वेसर्वा आ. हितेंद्र ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.

Web Title: Babaji Patil District Bank President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.