Join us

‘कार’नाम्याने बाबासाहेबांना मानवंदना

By admin | Published: April 22, 2016 2:21 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मूळ भारतीय वंशाच्या भारुलता कांबळे (४२) लंडनपासून महाडच्या चवदार तळ््यापर्यंत कारने प्रवास करणार आहेत.

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मूळ भारतीय वंशाच्या भारुलता कांबळे (४२) लंडनपासून महाडच्या चवदार तळ््यापर्यंत कारने प्रवास करणार आहेत. एकूण २८ देशांमधून तब्बल ३१ हजार किलोमीटरचा प्रवास भारुलता एकट्याने पूर्ण करणार आहेत.या मॅरेथॉन प्रवासाविषयी माहिती देताना भारुलता म्हणाल्या की, लंडनमधील ल्यूटन येथून १६ जुलै २०१६ रोजी या प्रवासाची सुरुवात होईल. दोन खंडांमधील २८ देशांमधून हा प्रवास असेल. या प्रवासापैकी ५ हजार ५०० किलोमीटरचा रस्ता हा डोंगराळ भागांतून जातो. त्यात अत्युच्च ठिकाण हे ३ हजार ७०० मीटर उंचीवरील आहे. या प्रवासादरम्यान २ हजार ५०० किलोमीटरचा रस्ता हा वाळवंटी भागातून जातो. त्यामुळे वेगवेगळ््या परिस्थितीत कारने प्रवास करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे भारुलता यांनी सांगितले. या जागतिक विक्रमाच्या माध्यमातून स्त्री सबलीकरण आणि शिक्षणाचा संदेश देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या जागतिक विक्रमादरम्यान विक्टर ब्रुस या ब्रिटिश महिलेने १९२७ साली केलेला आर्टिक्ट सर्कलचा विक्रमही मोडणार असल्याचे भारुलता यांनी सांगितले. ब्रुसने तिच्या पतीसोबत ४०० किलोमीटरचा प्रवास करून हा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र आर्टिक्ट सर्कलच्या जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाणार असल्याने पुन्हा दुसरी कोणतीही महिला नव्याने प्रस्थापित होणारा विक्रम मोडू शकणार नाही, असा दावाही भारुलता यांनी केला आहे.