कंगना राणौत घाबरणारी नाही, उद्धव ठाकरे सरकारला याचं उत्तर मिळेल; बबिता फोगाट, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 07:39 PM2020-09-09T19:39:33+5:302020-09-09T19:39:58+5:30

बबितानं व्हिडीओ पोस्ट करून महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

Babita Phogat backs Kangana Ranaut; says 'brave sisters like her are born rarely' | कंगना राणौत घाबरणारी नाही, उद्धव ठाकरे सरकारला याचं उत्तर मिळेल; बबिता फोगाट, Video

कंगना राणौत घाबरणारी नाही, उद्धव ठाकरे सरकारला याचं उत्तर मिळेल; बबिता फोगाट, Video

Next

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ( Kangana Ranaut) आणि मुंबई महानगर पालिका यांच्यातला वाद बुधवारी जास्तच चिघळला. BMCनं बुधवारी अभिनेत्रीच्या कार्यालयातील ( Office) अनधिकृत बांधकामावर बुल्डोजर चालवला. त्यानंतर सोशल मीडियावर कंगनाच्या समर्थनात अनेकजण उतरलं. त्यात राजकिय मंडळींपासून ते विविध क्षेत्रातील सेलिब्रेटीही आहेत. क्रीडा विश्वातील आणि सध्या भाजपाची सदस्य असलेल्या बबिता फोगाटनेही ( Babita Phogat) या प्रकरणावरून पुन्हा उद्धव ठाकरे सरकावर टीका केली आहे. कंगना घाबरणारी नाही, तिच्या मागे संपूर्ण देश आहे, असे सांगून बबितानं उद्धव ठाकरे सरकारला याचं उत्तर मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली.

..कल तेरा घमंड टुटेगा; उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत कंगनाचा संताप, Video

ऑफिस पुन्हा बनेल, परंतु शिवसेनेची 'औकात' सर्वांना माहीत झाली; बबिता फोगाटची टीका

बबितानं व्हिडीओ पोस्ट करून महाराष्ट्र सरकारवर टीका केली. पाहा ती काय म्हणाली...




ऑफिस पुन्हा बनेल, परंतु शिवसेनेची 'औकात' सर्वांना माहीत झाली
पालिकेच्या कारवाईनंतर भाजपात प्रवेश केलेल्या बबितानं जोरदार टीका केली. तिनं लिहिलं की,''मृत्यू जवळ आला की गिधाड शहराकडे धाव घेतो, शिवसेनेची तशीच अवस्था आहे. कंगना राणौत यांना घाबरणारी नाही. संपूर्ण देश तिच्या पाठीशी आहे. ऑफिस पुन्हा बनवलं जाईल, परंतु शिवसेनेची औकात सर्वांना माहीत पडली. कंगना तू घाबरू नकोस, संपूर्ण देश तुझ्यासोबत उभा आहे.''

जाणून घेऊया बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमध्ये काय-काय तोडले
 

बीएमसीने कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामांची नोंद केली, ती अशी आहे.

1) तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन तयार करण्यात आले) 
2) तळमजल्यावरील स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर बेकायदेशीरपणे तयार केले गेले आहे.
3) जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली
4) जेवणासाठी तळमजल्यावर अनधिकृतपणे जागा तयार करण्यात आली. 
5) पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे लाकडी पार्टिशन टाकून केबिन तयार करण्यात आली. 
6) पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे शौचालय बांधले
7) पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला
8) दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल
9) बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली टीका
 ''उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही बॉलिवूड माफियासोबत मिळून माझं घर उध्वस्त करून बदला घेतला आहेस? आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचा हा अहंकार तुटेल. वेळ नेमही एकसारखी नसते. हे करून तुम्ही माझ्यावर उपकार केले.. काश्मीरी पंडितांवर काय संकट आलं असेल हे माहीत होतं, परंतु आज मी ते स्वतः अनुभवलं. आज मी देशाला वचन देते की, मी फक्त अयोध्यावर नाही, तर काश्मीर पंडितांवरही चित्रपट तयार करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र,''असं कंगनानं ट्विट केलं.

पालिकेच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती
 कंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती.

Web Title: Babita Phogat backs Kangana Ranaut; says 'brave sisters like her are born rarely'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.