Join us

अखेर बबललाही मिळणार जोडीदार, सेंट्रल झू आॅथोरिटीकडून परवाना नूतनीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 2:37 AM

भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणखी तीन पेंग्विन लवकरच मुक्कामासाठी येणार आहेत. या परदेशी पाहुण्यांना राणीबागेत आणण्याची जय्यत तयारी सुरू आहे

मुंबई : भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आणखी तीन पेंग्विन लवकरच मुक्कामासाठी येणार आहेत. या परदेशी पाहुण्यांना राणीबागेत आणण्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, विविध सरकारी परवानगींबरोबर सेंट्रल झू आॅथोरिटीकडून प्राणिसंग्रहालयाच्या परवान्याचे नूतनीकरण होणे आवश्यक आहे. त्यानंतर, राणीबगेत पेंग्विन कक्षात एकटा फिरणाºया बबलला जोडीदार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.गेल्या वर्षी जुलै महिन्यात महापालिकेने राणीबागेत हेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन आणले होते, यापैकी डोरा या पेंग्विनचा जंतुसंसर्गाने आॅक्टोबर महिन्यात मृत्यू झाला होता. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटून पेंग्विनला परत पाठविण्याबरोबरच राणीबागेचा परवाना रद्द करण्याचीही मागणी झाली होती. दरम्यानच्या काळात पेंग्विन कक्षात उरलेल्या सात पेंग्विनपैकी तीन जोड्या जमल्याने, बबल हा नर पेंग्विन एकटा राहिला होता. बबलसाठी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला. मात्र, सीझेडएकडून राणीबागेच्या वार्षिक परवान्याचे नूतनीकरण होईपर्यंत नवीन पेंग्विन आणणे पालिकेला शक्य नाही. गेल्या वर्षी पेंग्विनवरून वाद उभा राहिल्यानंतर, सीझेडएने राणीबागेत काही बदल सुचविले होते. त्याच्यावर अंमल झाले का? याची खात्री करण्यासाठी सीझेडएचे अधिकारी गेल्या रविवारी राणीबागेची पाहणी करून गेले. याबाबतचा अहवाल महिन्याभरात त्यांनी सादर केल्यानंतर, राणीबागेच्या पुढील वर्षभराच्या परवान्याचे नूतनीकरण होऊ शकेल, असे पालिकेच्या एका अधिकाºयाने सांगितले.>बबलच निवडणार आपला जोडीदारगोवा ट्रेड फार्मिंग कंपनीकडून एक मादी पेंग्विन खरेदी करण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, पेंग्विनना समूहात राहण्याची सवय असल्याने, एका पेंग्विनला राणीबागेतील पेंग्विन स्वीकारणार नाहीत. त्यामुळे एकऐवजी तीन पेंग्विन आणण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे. त्यामुळे बबलला यातून आपला जोडीदार निवडता येणार आहे, परंतु राणीबागेत नवीन पेंग्विन येण्यास आणखी सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे.>दक्षिण कोरियातून पालिकेने २०१६ मध्ये हेम्बोल्ट जातीचे आठ पेंग्विन आणले. एक ते तीन वर्षे वयोगटातील या पेंग्विनचे वजन एक ते अडीच किलो आहे, तसेच त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे आहे.>45 कोटी रुपये पेंग्विनच्या खरेदीसाठी पालिकेने आतापर्यंत खर्च केले आहेत. यामध्ये पेंग्विनची खरेदी, त्यांच्यासाठी काचघर उभारणे, तसेच पाच वर्षांपर्यंत त्यांच्या देखभालीच्या खर्चाचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका