बाळाचा हात कापला, आता होणार चौकशी; केईएम रुग्णालयात घडली होती घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 06:34 AM2023-08-13T06:34:58+5:302023-08-13T06:35:24+5:30
५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात ‘केईएम हॉस्पिटलच्या बेफिकिरीमुळे कापावा लागला’, अशा मथळ्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे अवघ्या ५२ दिवसांच्या तान्हुल्याला हात गमवावा लागल्याची गंभीर दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी डॉक्टरांकडून काय निष्काळजीपणा झाला, हे तपासण्यासाठी रुग्णालयातील चार वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती नेमली आहे. १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
‘केईएम हॉस्पिटलच्या बेफिकिरीमुळे ५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात कापावा लागला’, अशा मथळ्याचे वृत्त शनिवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. डॉ. सुधाकर शिंदे यांनी शनिवारी केईएम रुग्णालयाला भेट दिली. केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि शिक्षण विभागाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांची भेट घेऊन डॉ. शिंदे यांनी सर्व प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला. बाळाची आई रुग्णालयात दाखल झाल्यापासून तान्हुल्याचा हात कापावा लागल्यापर्यंतचा घटनाक्रम त्यांनी जाणून घेतला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश डॉ. शिंदे यांनी दिले. महापालिकेतर्फे नियुक्त समितीमध्ये स्वत: अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. हरीश पाठक, ऑर्थोपेडिक सर्जरीचे विभागप्रमुख डॉ. मोहन देसाई, बालरोग विभागप्रमुख डॉ. सुनील कारंडे आणि औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली राजाध्यक्ष यांचा समावेश आहे.
५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात ‘केईएम हॉस्पिटलच्या बेफिकिरीमुळे कापावा लागला’, अशा मथळ्याचे वृत्त शनिवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली होती.
केईएमचे म्हणणे...
संबंधित तान्हुल्याच्या हातावरील उपचारासाठी रुग्णालयाकडून अथक प्रयत्न करण्यात आले. विविध तज्ज्ञांची मते जाणून घेत त्यानुसार उपचार करण्यात आले.