Join us

मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत

By admin | Published: January 23, 2017 6:21 PM

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच ऊत आला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच ऊत आला आहे. भाजपा आणि शिवसेना यांची युती संपुष्टात येण्याचं जवळपास निश्चित मानलं जात असताना भाजपानं मनसे आणि काँग्रेससह अन्य पक्षातील नेत्यांना फोडून पक्षात प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. भाजपानं मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे, काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहेर यांना दाखल करून घेतलं आहे. मंगेश सांगळे हे विक्रोळीतून, तर कृष्णा हेगडे विलेपार्लेतून माजी आमदार राहिले आहेत. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश नाईक आणि काँग्रेसच्या नगरसेविका लीना शुक्ला, नगरसेवक परमिंदरसिंग भामरा आणि मनसेचे जोगेश्वरीतील नगरसेवक भालचंद्र आंबुरे भाजपात दाखल झाले आहेत. (मुंबईत काँग्रेसला धक्का, हेगडे यांचा भाजपामध्ये प्रवेश)(युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, भाजपाचा सेनेला इशारा)भाजपा पारदर्शकतेचा पुरस्कार करते, तर काँग्रेसमध्ये काँट्रॅक्टरना तिकिटे दिली जातात. मुंबई काँग्रेसमधील सारेच संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीला वैतागले आहेत. त्यामुळेच आपण भाजपात प्रवेश करत आहे, असं माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सांगितलं आहे. तर भाजपा प्रवेश मनाला लागला आहे. राज ठाकरेंनी चेहरा दिला. मात्र मागच्या काळात ब-याच काही घटना घडल्या आहेत. त्यामुळेच भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेत असल्याचं मंगळे सांगळे म्हणाले आहेत.