लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील अध्यापक विद्यालयांत पहिल्या फेरीअखेर केवळ ३ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी डी. एड्.ला प्रवेश घेतला आहे. रखडलेली शिक्षक भरती आणि वाढता भ्रष्टाचार पाहता शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत चालला आहे. पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील प्रवेशांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, शिक्षणशास्त्र महाविद्यालये बंद पडण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांकडून नापसंतीराज्यात १६ शासकीय, ९७ अनुदानित आणि विनाअनुदानित अशी एकूण ५७५ अध्यापक विद्यालये आहेत. त्यांची विद्यार्थी प्रवेश क्षमता ३१ हजार २०७ एवढी आहे. यावर्षी डी. एड्. पदविकेला प्रवेश घेण्यासाठी केवळ १३ हजार ७९८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत.
ओढा कमी होण्याची कारणेराज्यात खासगी विनानुदानित शाळांमध्ये अत्यल्प पगारात शिक्षक काम करीत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची तब्बल ६० ते ७० हजार पदे रिक्त असतानाही शिक्षण विभागाचा पदभरतीबाबत उदासीन दृष्टिकोन यामुळे विद्यार्थ्यांनी डी. एड्.कडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. तसेच झटपट नोकरी मिळावी, यासाठी कौशल्यावर आधारित कोर्सेस आणि पदविका, पदवीला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
चार हजारांहून अधिक जागा मंजूरपहिली प्रवेश फेरी ११ ते १४ जुलै या कालावधीत झाली. मंजूर केलेल्या ६ हजार ७२८ जागांपैकी केवळ ३ हजार ९४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. दुसऱ्या प्रवेश फेरीला १८ जुलैला सुरुवात झाली असून, प्रवेशासाठी ४ हजार ७८८ जागा मंजूर केल्या आहेत. २१ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी डी. एड्. प्रवेशासाठी केवळ १३ हजार ७९८ प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अनेक अध्यापक विद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडणार आहेत. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २१ विद्यालये बंद झाली असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील डी. एड्. प्रवेश आकडेवारी
५९५२०२२-२३
५७४२०२३-२४
महाविद्यालयांची संख्या
३२,६४७२०२२-२३
प्रवेश क्षमता
३१,२०७२०२३-२४