मुंबई : प्रवाशांना तिकीट देण्यासाठी आलेल्या ट्रायमेक्स मशीनने पुन्हा एकदा बेस्ट उपक्रमाला दगा दिला आहे. ही मशीन वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना तिकीट देण्यात अडचण येत असून, यामुळे बस आगाराबाहेर काढणेही अवघड झाले आहे. परिणामी, प्रत्येक बसगाडीमागे बेस्टला दररोज १० हजार रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टचा तोटा वाढत आहे.बेस्ट उपक्रमात आधुनिक तिकीट यंत्र आणण्याचे धोरण आठ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले. तेव्हापासून ट्रायमॅक्स या यंत्राद्वारे बस तिकीट देण्यात येत आहे. या कंपनीबाबत असंख्य तक्रारी असताना नवीन कंत्राट काढण्यास बेस्ट प्रशासनाने विलंब केल्यामुळे याच कंपनीला मुदतवाढ देण्यात आली. मात्र मुदतवाढीनंतरही या कंपनीने बेस्टला जुनीच यंत्रे पुरवली. या मशिन्स नादुरुस्त असल्याने बस प्रवाशांना तिकीट देताना वाहकांची डोकेदुखी वाढली आहे.आधीच मशीन कमी त्यातच बºयाच मशिन्स नादुरुस्त अवस्थेत आहेत. मशिन्सची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागते. अशा असंख्य तक्रारी बस वाहकांकडून येत आहेत. बसमधील बरेच प्रवासी तिकीट न काढता उतरून जातात, त्यामुळे बेस्टचे दररोज लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. या तोट्यास बेस्ट प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप बेस्ट समिती सदस्यांनी केला. या विषयावर अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी पुढील आठवड्यात एक विशेष बैठक बोलावली आहे.संचित तोेटा २५०० कोटींवर- बेस्टवर पालिकेसह अनेक बँकांचे चार हजार कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज आहे. बेस्टला सध्या दररोज २.५० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. वर्षाला हा तोटा ९०० कोटी रुपयांचा असून, २०१०पासून बेस्टचा संचित तोटा २५०० कोटींवर गेला आहे.- बेस्टच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाºयांना पगार देण्यासही विलंब होत आहे. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा ठराव नुकताच पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला.- पालिका सभागृहानंतर आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. नगरविकास विभागाच्या मंजुरीनंतर बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून सादर केला जाईल. यामुळे बेस्टची आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.तुटीचा बेस्ट अर्थसंकल्प मंजुरीसाठी पुन्हा पालिकेतबेस्ट उपक्रमाचा सन २०१७-१८चा अर्थसंकल्प तुटीचा दाखविल्यामुळे मुंबई महापालिकेने तो नाकारला होता. मात्र हा अर्थसंकल्प अद्याप मंजूर न झाल्याने बेस्टच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करून तुटीचा अर्थसंकल्प पुन्हा पालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.बेस्टचा सन २०१७-१८चा अर्थसंकल्प ५९०.२३ कोटी तुटीचा होता. मात्र शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा असल्याने पालिकेने तो बेस्टकडे परत पाठविला होता. एवढ्या मोठ्या तुटीचे नफ्यात रूपांतर करणे शक्य नसल्याने बेस्ट समितीने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.१९७५मध्ये तीन कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्या वेळी तीन कोटींची तरतूद करण्याच्या अटींवर पालिकेने सदर अर्थसंकल्पास मंजुरी दिली होती. मात्र या वेळी तूट मोठी असल्याने पालिकेने असमर्थता दर्शविली. पालिका आयुक्तांनी आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवून बेस्टचा सन २०१७-१८चा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्याची विनंती पालिकेकडे करावी, अशी सूचना या वेळी करण्यात आली.घोटाळ्यांमुळेबिघडले आर्थिक गणितबेस्टमध्ये कैझन, केएलजी, ट्रायमॅक्स, कॅनडा शेड्युल्ड इत्यादी घोटाळ्यांमुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप होत आहे.वर्ष उत्पन्न खर्च तूट१९८०-८१ ५४.१५ ६६.९० १२.८३१९८७-८८ १२०.४१ १५६.३३ ३५.९११९९७-९८ ५३८.२४ ६४०.४० १०२.१५२००७-०८ ८५४.८८ १२२६.६९ ३७१.८०२०१७-१८ १७५३.५३ २७९९.४४ १०४५.९१आकडेवारी कोटींमध्ये
नादुरुस्त मशीनमुळे बेस्टचा तोटा वाढला; दररोज दहा हजार रुपये नुकसान, प्रवाशांना तिकीट देण्यात अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:46 AM