पायाभूत कामासाठी आज बदलापूर-कर्जत लोकल रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:01 AM2019-04-21T06:01:37+5:302019-04-21T06:02:37+5:30

बदलापूर ते वांगणी आणि नेरळ ते भिवपुरीदरम्यान पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

Badlapur-Karjat local cancellation today for basic work | पायाभूत कामासाठी आज बदलापूर-कर्जत लोकल रद्द

पायाभूत कामासाठी आज बदलापूर-कर्जत लोकल रद्द

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत यादरम्यान पायाभूत सुविधेच्या कामासाठी रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. बदलापूर ते वांगणी आणि नेरळ ते भिवपुरीदरम्यान पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

ब्लॉकदरम्यान बदलापूर ते कर्जत यादरम्यान दोन्ही दिशेकडील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीहून सकाळी ९ वाजून १ मिनिटाने सुटणारी कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालविण्यात येईल. सीएसएमटीहून कर्जतसाठी सुटणारी सकाळी ९.३८, १०.३६, सव्वा अकरा आणि दुपारी १ वाजून १३ मिनिटांची सीएमएमटी ते कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल. याचप्रमाणे कर्जतसाठी सुटणारी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांची आणि दुपारी १२ वाजून ५ मिनिटांची लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल. तर, सीएसएमटीहून खोपोलीसाठी सुटणारी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांची लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.

कर्जतहून सीएसएमटीसाठी सुटणारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १९ मिनिटांची, दुुपारी १२ वाजून १ मिनिटांची आणि दुपारी १ वाजताची लोकल बदलापूरहून सुटेल. तर कर्जतहून सीएसएमटीसाठी सुटणारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांची लोकल अंबरनाथहून सुटेल. कर्जत ते अंबरनाथ लोकल रद्द केली आहे. कर्जत ते ठाणे या स्थानकांदरम्यान दुपारी १२ वाजून २१ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून २७ मिनिटांची कर्जतहून सुटणारी लोकल बदलापूरहून चालविण्यात येईल. तर, कर्जत ते बदलापूर लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. खोपोलीहून सीएसएमटीसाठी दुपारी १ वाजून ४८ मिनिटांची लोकल बदलापूरहून चालविण्यात येईल.

ब्लॉकदरम्यान दिवा-पनवेल-कर्जत मार्गाने जाणार मेल, एक्स्प्रेस
कर्जत दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक १७२२२ एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३३९ सीएसएमटी-नागरकोइल एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७०३१ सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत मार्गाने चालविण्यात येईल.
सीएसएमटी दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक १७०३१ हैदराबाद-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०४१ चेन्नई-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०१४ कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा या मार्गे चालविण्यात येईल. यासह दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस सेवेला दिवा स्थानकावर थांबा दिला जाईल.

Web Title: Badlapur-Karjat local cancellation today for basic work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.