पुलाच्या कामासाठी उद्या बदलापूर ते कर्जत मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 04:57 AM2019-01-26T04:57:46+5:302019-01-26T04:58:02+5:30

मध्य रेल्वेवरील बदलापूर ते कर्जत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल.

Badlapur to Karjat Mega Blocks for the bridge work | पुलाच्या कामासाठी उद्या बदलापूर ते कर्जत मेगाब्लॉक

पुलाच्या कामासाठी उद्या बदलापूर ते कर्जत मेगाब्लॉक

Next

मुंबई : मध्य रेल्वेवरील बदलापूर ते कर्जत दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते २ वाजून ३० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल. भिवपुरी रोड स्थानकावर कर्जत दिशेकडे ६ मीटर लांबीच्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी कर्जत, भिवपुरी रोड या ठिकाणी आणि येथून सीएसएमटीकडे जाणाºया प्रवाशांचे हाल होतील.
या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाका एक्स्प्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस, सीएसएमटी-नागरकोईल एक्स्प्रेस या एक्स्प्रेस दिवा-पनवेल-कर्जत या मार्गाने जातील. भुसावळ-पुणे ही एक्स्प्रेस मनमाड-दौड या मार्गाने जाईल. सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस दुपारी २ वाजून ३० मिनिटांऐवजी दुपारी २ वाजता सुटेल, तर सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
>कर्जतकडे जाणाºया लोकलवर परिणाम
सकाळी ९ वाजून १ मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत उपलब्ध असेल.
सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल सकाळी १० वाजून ३६ मिनिटांनी चालविण्यात येईल.
सकाळी १० वाजून ३८ मिनिटे, तसेच १२ वाजून ५ मिनिटांची ठाणे ते कर्जत या दोन्ही लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येतील.
सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १३ मिनिटांची सीएसएमटी ते कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.
दुपारी १२ वाजून २२ मिनिटांची सीएसएमटी ते खोपोली लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.
सीएसएमटीकडे जाणाºया लोकलचे वेळापत्रक विस्कळीत
सकाळी १० वाजून ४५ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १९ मिनिटांची, दुपारी १२ वाजून १ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १ मिनिटांची कर्जत ते सीएसएमटी लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.
दुपारी १ वाजून १ मिनिटांची कर्जत ते सीएसएमटी लोकल अंबरनाथपर्यंतच धावेल.
दुपारी १ वाजून २७ मिनिटांची कर्जत ते ठाणे लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.

Web Title: Badlapur to Karjat Mega Blocks for the bridge work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.