लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुहागर येथील अरबी समुद्रकिनारी २२ फेब्रुवारी रोजी टॅग करण्यात आलेल्या बागेश्री या मादी कासवाने आता बंगालचा उपसागर गाठला आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑलिव्ह रिडले प्रजातींची कासवे ज्या समुद्री प्रदेशात आढळतात, तेथेच बागेश्री दाखल झाली आहे. त्यामुळे समुद्र अभ्यासकांचे लक्ष आणखीनच या संशोधनाकडे वळले असून, तिच्या पुढील प्रवासावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, बागेश्रीबरोबर टॅग केलेल्या गुहा या कासवाचा संपर्क दहा दिवस तुटला होता. मात्र, पुन्हा गुहाशी संपर्क झाला असून, गुहा केरळच्या समुद्रकिनारी असल्याचे निरीक्षणास आल्याचे मॅनग्रोव्हज फाउंडेशनकडून सांगण्यात आले.
केव्हा ट्रान्समीटर बसवले?१६ फेब्रुवारी २०२२गुहागर येथे रेवा आणि लक्ष्मी या कासवांना ट्रान्समीटर बसवले.१५ फेब्रुवारी २०२२वनश्री नावाचे कासव गुहागर समुद्रकिनारी सोडण्यात आले. प्रथमा, सावनी या कासवांना वेळास आणि रत्नागिरी येथून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविण्यात आले होते.
देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारी भागात टॅग करण्यात आलेली कासवे बंगालच्या उपसागरात प्रवेश करत असून, या प्रवेशामुळे येथील प्रदेशात मुबलक खाद्य असू शकते, असा अंदाज यानिमित्ताने समुद्री अभ्यासकांनी वर्तविला आहे.देशाच्या पूर्व किनारपट्टीवर आढळणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांची भ्रमंती नेमकी कशी होते, याचा अभ्यास करण्यासाठी या कासवांना सॅटेलाइट टॅगिंग केले जाते.वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांतर्गत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्यात येत आहेत.