हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला जामीन नाकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:38 AM2024-05-17T10:38:27+5:302024-05-17T10:39:10+5:30

व्यवसायात भावंडांची फसवणूक केल्याचे प्रकरण

bail denied to hardik pandya step brother | हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला जामीन नाकारला

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला जामीन नाकारला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पॉलिमरच्या व्यवसायात भावंडांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या क्रिकेटपटू हार्दिक आणि कुणाला पंड्या यांच्या सावत्र भावाची सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. गंभीर आर्थिक गुन्हा असून आणि त्यात मोठी रक्कम गुंतलेली आहे. 

 पांड्या भावांनी सावत्र भावाबरोबर २०२१ मध्ये भागीदारीमध्ये पॉलिमर व्यवसाय सुरू केला.  दोन्ही भावांनी ४० टक्के गुंतवणूक केली, तर वैभवने २० टक्के गुंतवणूक केली. त्यानंतर वैभवने क्रिकेटपटूंना न सांगता याच व्यवसायात आणखी एक फर्म स्थापन केली आणि व्यवसाय सुरू केला. भागीदारीतील नफा कमी झाला. मात्र, वैभवच्या नफ्यात वाढ झाली. त्यांनी दोन्ही भावांना फसवून स्वतःच्या नफ्यात वाढ केली. त्यानंतर दोनदा त्याच्या बँक खात्यात ७२  लाख जमा केले आणि भावांना फसविले. मात्र, वैभवने सर्व आरोप फेटाळले आहेत. 

वैभवच्या खात्यात ७२ लाख जमा झाल्याचा तपास होणे आवश्यक आहे, असे म्हणत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. बी. शिंदे यांनी १० मे रोजी वैभव पांड्याचा जामीन अर्ज फेटाळला. बुधवारी आदेशाची प्रत उपलब्ध झाली आहे.  

 

Web Title: bail denied to hardik pandya step brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.