दियाला जामीन, मात्र पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:05 AM2021-06-27T04:05:23+5:302021-06-27T04:05:23+5:30
जान्हवी कुकरेजा हत्याप्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खारमधील विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजाच्या हत्येचा आरोप असलेली तिची बालमैत्रीण दिया पडळकरला ...
जान्हवी कुकरेजा हत्याप्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खारमधील विद्यार्थिनी जान्हवी कुकरेजाच्या हत्येचा आरोप असलेली तिची बालमैत्रीण दिया पडळकरला शनिवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र श्री जोगधनकर याचा जमीन फेटाळल्याने त्याला कैदेतच राहावे लागेल.
दियाला जामीन देताना तिला शहर सोडून कुठेही बाहेर जाता येणार नाही. तसेच दर महिन्याला खार पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची ताकीद न्यायालयाने दिली.
दियाच्या जामिनावर स्थगिती मिळविण्यासाठी जान्हवीचे वकील रिझवान मर्चंट यांनी अर्ज केला हाेता. जेणेकरून या जमिनाला उच्च न्यायालयात आव्हान देता येईल. दरम्यान, दियाला जामीन मिळाला असला तरी मुख्य आरोपी जोगधनकरचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.
जान्हवीची गेल्या थर्टीफस्टला हत्या करण्यात आली होती. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पडळकर आणि जोगधनकरला अटक केली.
.............................................................