पेण, अलिबागमध्ये लाचखोरांना अटक

By admin | Published: November 3, 2014 11:09 PM2014-11-03T23:09:49+5:302014-11-03T23:09:49+5:30

पेण तहसिलदार कार्यालयातील लिपीक अमर ठमके याने बिनशेती परवानगी देण्याकरिता स्वत:साठी पाच हजार रुपये तर पेणच्या तहसिलदार सुकेशिनी पगारे यांच्याकरीता १० हजार रुपये लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले आहे.

Bailers arrested in Pen, Alibaug | पेण, अलिबागमध्ये लाचखोरांना अटक

पेण, अलिबागमध्ये लाचखोरांना अटक

Next

अलिबाग : पेण तहसिलदार कार्यालयातील लिपीक अमर ठमके याने बिनशेती परवानगी देण्याकरिता स्वत:साठी पाच हजार रुपये तर पेणच्या तहसिलदार सुकेशिनी पगारे यांच्याकरीता १० हजार रुपये लाच मागीतल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस उप निरिक्षक सुनिल कलगुटकर यांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.
२३ जुलै २०१४ रोजी तक्रारदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली होती. तक्रारदारांच्या मालकीची वडखळ (वावे) येथील जमीनीची बिनशेती परवानगी मिळण्यासाठी त्यांनी ११मार्च २०१४ रोजी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. मे २०१४ मध्ये पेणच्या तहसिलदार सुकेशिनी पगारे यांनी तक्रारदार या जागेची प्रत्यक्ष पहाणी केली असता जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी आणलेली रेती, डबर ठेवल्याचे त्याठिकाणी दिसून आले.
याप्रकरणी पेण तहसिलदार कार्यालयातील लिपिक ठमके यानी तक्रारदारास सुमारे ७८ हजार रुपये दंडाच्या रेती व डबरच्या दोन वेगवेगळ्या बनविलेल्या व सही न झालेल्या नोटीसा दाखवल्या व त्या नोटीस रद्द करण्यासाठी व बिनशेती प्रकरणात ना हरकत दाखला देण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली.
३० जुलै २०१४ रोजी तहसिलदार पगारे यांची तक्रारदारांनी भेट घेवून लिपीक ठमके यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता, पगारे यांनी तक्रारदारास आणखी दंडाची नोटीस बजावण्यात येईल, असे सांगितले. या बाबत तक्रारदार यांनी वेळोवेळी भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट टाळली.
तहसिलदार पगारे यांनी तक्रारदार यांचे विरुध्द काढलेली दंडाची नोटीस ही चुकिची असल्याबाबत वाशी मंडळ अधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर २०१४ रोजीचे त्यांचे पडताळणीमध्ये कबुल केले आहे. गुन्ह्याचे तपासामध्ये तहसिलदार यानी चुकिची नोटीस का काढली याबाबत चौकशी करुन योग्यती कायदेशिर कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबमधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुनिल कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लाचलुचपत प्रतिबमधक विभागाच्या विशेष पथकाने केली आहे.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Bailers arrested in Pen, Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.