मुंबई - 'लोकमत डॉट कॉम' यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त 'बाईमाणूस' हे अभियान राबवतंय. बाई किंवा स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, हा संदेश जनमानसांत जावा, हा यामागचा हेतू आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर, ज्या बाईमाणूस ही व्याख्या ख-या अर्थानं जगल्या, अशा स्त्रियांना आज दुपारी 3 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे भेटणार आहोत.
यांचा आहे सहभाग
शोभना
अनुजा कामत
मालती
सीमा खंडाळे
मनीषा लाखे
प्रतीभा ताई
मोहीमेमध्ये सहभागी व्हा !दरवर्षी 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या समस्या त्यांच्या आयुष्यातील मुद्दे जाणून घेण्यासाठी त्याकडे लक्षवेधण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या जगात 50 % जनतेला एखाद्या आंतरराष्ट्रीय दिवसाची गरज भासत असेल, तर मग आपला विकास खरंच झाला आहे असं म्हणायचं का? महिलांचे मुद्दे, समस्या नक्की काय आहेत? त्यांच्यानिर्मूलनासाठी आपण काय करू शकतो?असे अनेक प्रश्न आणि काही उत्तर घेऊन आम्ही येत आहोत. तेव्हा या मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हा आणि बाईला माणूस म्हणून जगता यावं यासाठी तुमचाही थोडा हातभार लावा.