मुंबई : खासगी जीवनविमा क्षेत्रामधील एक प्रमुख कंपनी म्हणून गणल्या जाणाऱ्या ह्यबजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.ने आज मूल्यसंकुलावर आधारलेली बजाज अलायन्झलाइफ गोल अश्युअर योजना जाहीर केलीआहे. नवीन सुविधा असलेली ही युलिप योजना ग्राहकांना गुंतवणूक लाभ देणारी असून ती जीवनकवच पुरविणारी आहे. भारतामधील युलिप संदर्भातील योजना पुरविणाऱ्यांमध्ये ही योजना ग्राहकांना दोन प्रकारचे विशेष लाभ मिळवून देणारी आहे. रीटर्न ऑफ मोरटॅलिटी चार्जेस (आरओएमसी) या योजनेद्वारे ग्राहकांना आपल्यापॉलिसीची मुदत संपल्यानंतर जीवनकवचाची रक्कम परत मिळणार आहे. तसेच ही पॉलिसी संपल्यानंतर ज्या ग्राहकांना हप्त्यांमध्ये लाभ हवे असतील त्यांना पुढील पाच वर्षांमध्ये ह्यरीटर्न इनहान्सर पोटीठरलेल्या हप्त्यांमध्ये ०.५ टक्के अधिक रकमेची भर पडेल. या कालावधीदरम्यान ग्राहकांचे फंड मूल्य त्यांच्या इच्छेनुसार फंडाशी संलग्न राहील.बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चुघ यावेळी म्हणाले,आम्ही सादर केलेली नवीन योजना विमा क्षेत्रामध्ये नवीन पायंडानिर्माण करणारी ठरेल. हल्लीच्या काळातील गुंतवणूकदारांची आयुष्यातील उद्दिष्टपूर्तीची व्याख्या बदलली आहे. असे गुंतवणूकदार विश्वासार्ह संस्थांनी सादर केलेल्या सोप्या योजनांच्या प्रतीक्षेत आहेत.आजच्या काळातील गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण होतील अशी आमची ही नवीन योजना आहे. ग्राहकांसाठीचे लाभ : बजाज अलायन्झ लाइफ गोल अश्युरन्सतर्फे आरओएमसी आणि रीटर्न एनहान्सरबरोबरच फंड बुस्टर नावाची सुविधाही ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर ग्राहकांच्या फंडामध्येवर्ग होणारी ही रक्कम असेल. या नवीन युलिप योजनेमध्ये प्रीमियम वेळेत भरणाऱ्या ग्राहकांसाठी लॉयल्टी अॅडिशन्स पुरविण्यात आल्या आहेत. ही योजना वार्षिक ५ लाख रुपये प्रीमियम भरणाऱ्या आणि दहा वर्षांची मुदत असणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे. या योजनेमध्ये मंजूर झालेल्या रकमेत कपात करणे, प्रीमियर भरण्याच्या मुदतीमधील बदल आणि अमर्याद हस्तांतरण सुविधा ग्राहकांसाठी पुरविण्यातआली आहे. तसेच कलम ८०सी आणि १०(१० डी) अंतर्गत ग्राहकांना कर सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे बजाज अलायन्झ लाइफ गोलद्वारे ग्राहकांना त्यांच्या गरजा तसेच धोका उचलण्याच्या ताकदी ओळखून चार पोर्टफोलिओ धोरणे ठरविण्यात आली आहेत. गुंतवणूकदार सिलेक्टेबल पोर्टफोलिओ धोरण, व्हीलऑफ लाइफ पोर्टफोलिओ धोरण, ट्रीगरबेस्ड पोर्टफोलिओ धोरण आणि ऑटो ट्रान्स्फर धोरण अशाप्रकारची ही चार धोरणे आहेत.
‘बजाज अलायन्झ लाइफ’तर्फे नवीन योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:24 AM