मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगातील अनेक देश आपली लस तयार करण्यात व्यस्त आहेत. तर काही कंपन्या लस तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण या लसीची आतुरतेने वाट पाहत आहे.
दुसरीकडे, भारताचे प्रसिद्ध बिझनेसमन आणि बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी याबद्दल एक मोठे विधान केले आहे. जोपर्यंत सरकार कोरोना लस अनिवार्य करत नाही, तोपर्यंत ही लस घेणार नाही. कारण, ही एक नवीन लस असून ती घाईघाईने बनविली जात आहे, असे विधान राजीव बजाज यांनी केले आहे.
राजीव बजाज यांनी यासंदर्भात एका खासगी वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यावेळी, जी लस नवीन आहे आणि जी घाईघाईने तयार केली गेली आहे. जी मी घेईन, ती सर्वात शेवटची गोष्ट असेल. तसेच, होमिओपॅथी, योग आणि सोशल डिस्टंसिंगवर अधिक विश्वास ठेवून त्यांचे पालन करणार असल्याचे राजीव बजाज यांनी सांगितले. याचबरोबर, वेगवेगळ्या ठिकाणी आणि प्रसंगी लॉकडाऊन करण्याऐवजी सरकारने २० ते ६० वर्षांच्या निरोगी लोकांना सामान्यपणे त्यांचे काम करण्यास परवानगी दिली पाहिजे, असेही राजीव बजाज म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील १६ लाख ३८ हजार ८७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५ लाख ४५ हजार ३१८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १० लाख ५७हजार ८०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
कोरोना मृतांच्या संख्येत भारत पाचव्या स्थानीदेशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७४७ इतकी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारताने आता इटलीला देखील मागे टाकले आहे. कोरोना मृतांच्या संख्येत भारत आता पाचव्या स्थानी पोहोचला आहे. इटलीत करोनामुळे आतापर्यंत ३५ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आणखी बातम्या...
पंजाबमध्ये विषारी दारूमुळे २१ जणांचा मृत्यू, तपासासाठी एसआयटीची स्थापना
सीमेवर चीनच्या हालचाली पुन्हा वाढल्या; पँगोंगमध्ये अतिरिक्त सैन्य, बोटी तैनात
CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा
गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास दहा हजारांचा दंड, युपी सरकारकडून आदेश जारी
मंत्र्यांची कोरोनावर मात, पण स्वागतावेळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन