बाळासाहेबांची आजही दररोज सकाळी पूजा करतो, त्यांच्या भाषणाची कॅसेट ऐकतो, त्यांना कधीच विसरू शकत नाही, अशी भावना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत २७ वर्ष मदतनीस म्हणून राहिलेल्या चंपासिंग थापा याने व्यक्त केली. बाळासाहेबांच्या जयंती दिनी शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यात चंपासिंग थापा देखील मेळाव्याला उपस्थित होता. 'लोकमत मुंबई'शी बोलताना चंपासिंग थापाने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
"बाळासाहेबांसोबत कायम राहिलो म्हणून एवढी इज्जत मिळाली. बाहेर गेलो असतो तर कुणी ओळखलं नसतं. त्यांच्यासोबत राहिलो म्हणून आज मला ओळखतात", असं थापा म्हणाला. बाळासाहेबांसोबत २७ वर्ष राहिलो. त्यांची सेवा करता आली याचा अभिमान असल्याचंही थापानं सांगितलं.
दररोज साहेबांची पूजा करतो"१९८५ साली माझी बाळासाहेबांशी पहिली भेट झाली. तेव्हापासून मी साहेबांसोबतच होतो. २७ वर्ष साहेबांसोबतच राहिलो. त्यांच्या बाजूच्याच खोलीत मी असायचो. साहेबांची आजही आठवण येते. त्यांच्या भाषणांची कॅसेट ऐकतो. सकाळी उठल्यावर दररोज त्यांची पूजा करतो. ते माझ्यासाठी दैवत आहेत", असं थापानं सांगितलं.
थापाच्या मुलाखतीचा व्हिडिओ...
साहेब ओरडायचे, पण..."साहेब कधी रागावले तर चिडायचे. बोलायचे मला. पण दुसऱ्याच मिनिटाला माझी विचारपूस करायचे. राग नको मानू म्हणून दुसऱ्या मिनिटाला सगळं विसरून जायचे. साहेब एकदा म्हणालेले की तुला इथून बाहेर गेलास की चांगला पगार मिळेल. काम चांगलं आहे तुझं. मोठा होशील. पण तुला तिथे इज्जत मिळणार नाही. मी विचार केला साहेब असं का म्हणाले असतील. पण आज कळतंय इज्जत काय असते. तेव्हा बाहेर गेलो असतो तर कुणी ओळखलं नसतं. पण त्यांच्यासोबत राहिलो म्हणून आज मला ओळखतात. लोकांच्या समोर मी आज आहे", असंही थापा म्हणाला.