Join us  

नाशिकमधील शस्त्रसंग्राहलयाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार - राज ठाकरे

By admin | Published: October 25, 2015 9:20 PM

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना जागा मिळवू शकलेली नाही, आम्ही नाशिकमध्ये बांधण्यात येणार्‍या शस्त्रसंग्राहलयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २५ -  बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेना जागा मिळवू शकलेली नाही, आम्ही नाशिकमध्ये बांधण्यात येणार्‍या शस्त्रसंग्राहलयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार आहे, हीच खरी त्यांना आदरांजली असेल अशी घोषणा राज ठाकरेंनी कल्याण - कल्याण -डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत केली. 
कल्याण - कल्याण -डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेची २० वर्ष सत्ता असताना तिथे विकास झाला नाही त्यामुळे आता मनसेला संधी द्या. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आहे. गेल्या तीन वर्षात मनसेने नाशिक शहराचा विकास करून दाखवला आहे. त्याची चित्रफित कल्याण डोंबिवलीकरांना दाखवल्यावर निश्चितच मनसेला यश मिळेल, असे मत राज ठाकरे यांनी कल्याण येथिल आपल्या सभेदरम्यान केली.
कल्याण-डोंबिवलीतल्या प्रचाराचा आजचा शेवटचा रविवार आहे. आता प्रचाराला फक्त पाच दिवस राहिले असल्यानं सर्वच पक्षांचे स्टार नेते मोठ मोठ्या रॅलीज् काढून जोरदार प्रचार करत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही आज (रविवारी) कल्याण पूर्व इथे सभा घेतली आहे. यावेळी त्यांनी युती सरकारवर जोरदार टीका केली.
लोकमान्य टिळकांना आणि सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेतील समस्या सुटणार आहेत का? असा टोलाही त्यांनी शिवसेनेला हाणला आहे. त्याचबरोबर महापालिकेला मिळालेले १५ हजार कोटी रुपये कुठे गेले असा सावल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. सुधींद्र कुलकर्णींच्या कानफटात मारण्याऐवजी शाई कसली फासताय?   भारत-पाकिस्तान यांच्यातील समझौता एक्स्प्रेस बंद करून दाखवा असं आव्हानही राज ठाकरेंनी शिवसेनेला दिलं आहे.