मुंबई : भारतीय कालखंडाला गुरू-शिष्यांची महान परंपरा लाभली आहे. काळ बदलत असताना जरी गुरू-शिष्य परंपरा थोडी व्यावसायिक होत असली आणि गुरुदक्षिणेला एकलव्यासारखे स्वरूप जरी नसले, तरीही गुरूच्या उपकारांची परतफेड ही त्याला त्याच्या शिष्याने त्याच्याच अखंड कार्याने दिली तर मग क्या बात? असेच काहीसे घडत आहे, मूर्तिकार बाळा पाटील यांच्याबाबत.प्रभादेवी येथील सेंच्युरी बाजारमधील श्रीगणेश चाळजवळील ब्राह्मणदेव मंदिरात पाटील यांनी शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून करत असून, हा वारसा पाटील यांना त्यांचे गुरू कृष्णा मालवणकर यांच्याकडून मिळाला आहे. चित्रकार कृष्णा मालवणकर यांनी शाडूचा गणपती आणि गौरी या व्यवसायात अधिक काळ योगदान दिले आहे.सदैव त्यांच्या मनात एकच शंका असायची की, ज्या भक्तांनी इतकी वर्षे एकाच प्रकारची गणेशमूर्ती नेली, त्यांना माझ्या पश्चात मूर्ती कशा मिळतील? परंतु गणेशाच्या मूर्ती साकारण्याची ओढ असलेल्या मालवणकरांना त्यांच्या कार्यासाठी वारस मिळाला, तो बाळा पाटील यांच्या रूपाने.
गुरूंचा वारसा चालविणारा शिष्य, नवसाच्या गणेशमूर्ती साकारणारे बाळा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 2:35 AM