शिल्लक रक्कमही परत मिळणार
By admin | Published: June 24, 2016 04:00 AM2016-06-24T04:00:54+5:302016-06-24T04:00:54+5:30
एखाद्या प्रवाशाची रक्कम बसवाहकाकडे शिल्लक असेल, तर प्रवास दिनांकाच्या तीन दिवसांनंतर बेस्ट उपक्रमाच्या कोणत्याही नजीकच्या आगारातील तिकीट व रोख विभागातील अधिकाऱ्यांकडे
मुंबई : एखाद्या प्रवाशाची रक्कम बसवाहकाकडे शिल्लक असेल, तर प्रवास दिनांकाच्या तीन दिवसांनंतर बेस्ट उपक्रमाच्या कोणत्याही नजीकच्या आगारातील तिकीट व रोख विभागातील अधिकाऱ्यांकडे मूळ तिकीट किंवा मूळ तिकिटाची छायांकित प्रत व प्रवासी शिल्लक, तिकीट जमा करून त्यांना ती रक्कम मिळवता येणार आहे, तसेच बेस्ट उपक्रमाच्या ई-मेल आयडीवर प्रवासी शिल्लक रकमेबाबत ई-मेल करून त्यांना सोयीस्कर असलेल्या बस आगारातील तिकीट व रोख विभागात रविवार व सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते ३.३० व शनिवारी सकाळी ९.३० ते १२ या कालावधीत जाऊन तेथील अधिकाऱ्याला ई-मेलची प्रत, मूळ तिकीट किंवा मूळ तिकिटाची छायांकित प्रत व प्रवासी शिल्लक तिकीट सादर करून, प्रवाशाला आपली शिल्लक रक्कम प्राप्त करून घेता येईल. ई-मेल आयडी-३१ंल्ल२स्रङ्म१३@ुी२३४ल्लीि१३ं‘्रल्लॅ.ूङ्मे. (प्रतिनिधी)