Join us

'मी मुख्यमंत्री होईन असे वचन बाळासाहेबांना कधीही दिले नव्हते पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:02 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने वचनपूर्ती या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई: चाळीस वर्षे आम्ही ज्यांच्या विरोधात राजकारण केले त्यांच्यासोबत उघडपणे गेलो असलो तरी आमचा रंग भगवाच आहे आणि अंतरंगही भगवेच आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईतल्या बीकेसीमध्ये शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने वचनपूर्ती या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी स्वत: मुख्यमंत्री होईल, असे वचन बाळासाहेबांना कधीही दिलेले नव्हते. पण एका परिस्थितीत मला ते स्वीकारावे लागले. ते स्वीकारत असताना हजारो शिवसैनिकांचे बलिदान, त्याग आणि समर्पण यामुळे मी इथपर्यंत आलो याची मला जाणीव आहे. भगवा कधीही खाली ठेवलेला नाही, ठेवणार नाही. मी मुख्यमंत्री झालो ही वचनपूर्ती नाही, तर त्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, असे सांगत उद्धव यांनी भविष्यात शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारच, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

मित्रपक्षानं विश्वासघात केल्यानं विरोधकांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. यावरुन शिवसेनेचा चेहरा उघडा पडला, अशी टीका होते. मात्र २०१४ मध्ये तुम्ही संपूर्ण उघडे झाला होतात, त्याचं काय, असा प्रश्न उद्धव यांनी विचारला. २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली. तेव्हा सत्ता स्थापन करताना अदृश्य हातांची मदत घेतलीत. तेव्हा तुम्ही पूर्ण उघडे झालात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच मित्रपक्षानं विश्वासघात केल्यानं विरोधकांसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. यावरुन शिवसेनेचा चेहरा उघडा पडला असल्याच्या टीकेवर २०१४ मध्ये तुम्ही संपूर्ण उघडे झाला होतात, त्याचं काय असा सवाल उपस्थित केला. २०१४ मध्ये तुम्ही युती तोडली. तेव्हा सत्ता स्थापन करताना अदृश्य हातांची मदत घेतलीत. तेव्हा तुम्ही पूर्ण उघडे झालात, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.

आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवेच, वचनपूर्ती सोहळ्यात उद्धव ठाकरेंचे वचन

टॅग्स :उद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र सरकार